अचानक रात्री तब्येत बिघडली, आईला मृ’त्यूच्या दारातून वाचवण्यासाठी उभा केला कर्जाचा डोंगर, वाचा डोळ्यांमधून पाणी आणणारी कहाणी…

अचानक रात्री तब्येत बिघडली, आईला मृ’त्यूच्या दारातून वाचवण्यासाठी उभा केला कर्जाचा डोंगर, वाचा डोळ्यांमधून पाणी आणणारी कहाणी…

आज जगभरात ‘मदर्स डे‘ अर्थात मातृ दिवस साजरा केला जात आहे. आपल्या आयुष्यातील आईचं स्थान दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. आई आपल्या लेकरासाठी स्वत:चा जीवही संकटात टाकू शकते. तिची माया, तिचं प्रेम कुठेही मिळणार नाही. उतारवयात याचआईला आपल्या आधाराची खूप जास्त गरज असते आणि तिचे ऋृण फेडण्याची तिच एक संधी आपल्याकडे असते. आजच्या मदर डेच्या निमित्ताने अशाच एका मुलाची कथा ज्याने आपल्या आईला मृत्यूच्या दारातून सुखरुप बाहेर काढलं…

नक्की काय घडलं?

नंदुरबार जिल्ह्यामधील नवापूर शहरातील नव्या महादेव गल्लीमध्ये पाटील कुटुंब वास्तव्यास आहे. कुटुंबातील ‘मीनाबाई राजेंद्र पाटील’ ह्यांचे वय ५४ वर्ष असून त्यांची रात्री अचानक प्रकृती बिघडली आणि त्यांना श्वास घेण्यास अडचण येऊ लागली. त्यांना तातडीने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात फक्त तीन तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक होता. डॉक्टरांनी आधी मीनाबाई यांची ऑक्सिजन लेव्हल तपासली. तेव्हा त्यांची ऑक्सिजनती लेव्हल केवळ ७० होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांचा मुलगा निलेश पाटील यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.
आधी नवापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल केलं

नंदुरबारमधील सर्व सरकारी आणि खाजगी रूग्णालये को’रो’ना’च्या रुग्णांनी भरलेली होती. निलेश यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना काय करावे ते सुचत नव्हते. त्यांनी आधी ऑक्सिजनयुक्त रूग्णवहिकेचा शोध घेतला. रूग्णवाहिका मिळाली पण ऑक्सिजन मात्र मिळालं नाही. त्यांनी अजिबात वेळ न दडवता आईला नवापूर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी रूग्णाची परिस्थिती नाजूक असल्याचं सांगितलं व तातडीने गुजरातला घेऊन जाण्याचा सल्ला दिला.

मित्राकडून केली ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था

रात्रीची वेळ होती आणि त्यातही निलेश यांच्या संजय पाटील नावाच्या मित्राने ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था केली. त्यानंतर निलेश पाटील आपल्या आईला घेऊन बारडोली येथील खाजगी रुग्णालयात गेले. त्यांच्यासोबत काका महेंद्र पाटील हे देखील होतेच. यादरम्यान ते देखील को’रो’ना पॉझिटिव्ह आले. त्यानंतर एकट्या निलेश यांच्यावर जबाबदार पडली.

आईच्या फुफ्फुसात झाल होत ७० टक्के इन्फेक्शन

निलेश यांनी आईचा सिटीस्कॅन केला. आणि त्यामध्ये आईच्या फुफ्फुसात तब्ब्ल ७० टक्के इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली. डॉक्टरांनी १२ तासाची मुदत दिली होती. उपचारासाठी लाखो रूपयांचा खर्च येणार होता. मुलाने खर्चाची परवा न करता लाखो रुपये व्याजाने घेतले. त्यामुळे आईवर उपचार सुरू झाला. आईवर आठ दिवस उपचार सुरू राहिला. बिल साडेतीन लाख रूपये आले. आईच्या प्रकृतीत थोडा सुधार झाला. पण ऑक्सिजन काही दिवस ठेवावा लागेल, असे सांगून घरी सोडण्यात आले. ऑक्सिजन दररोज लागणार होता. निलेश यांनी ऑक्सिजन मशीन घरी आणले. यासाठी दररोज दोन हजार रूपये खर्च येत होता मात्र निलेश यांनी पैशांची पर्वा न करता आईवर इलाज सुरू ठेवला.

आईला मरणाच्या दारातून सुखरूप घरी आणले

एकीकडे आई बरी होत होती तर दुसरीकडे पैशांचा बोजा वाढत होता. पाटील कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. वडीलाचे छत्र हरपलेले, घरात मतीमंद भाऊ, पत्नी, एक लहान मुलगा संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी एकट्यावर होती. दिवसाला ३०० रुपये कमावणारा निलेश राजेंद्र पाटील या युवकाने डोक्यावर कर्जाचा डोंगर चढवत कोरोनाबाधित आईला मरणाच्या दारातून सुखरूप घरी आणले.

अनेकजण को’रो’ना’च्या आजाराला आणि लागणाऱ्या पैशांना घाबरतात, बऱ्याचदा शेवटी हाती केवळ मृत्यू येतो. पण निलेश पाटील या तरुणाने अगदी संयमाने परिस्थिती सांभाळून आपल्या आईला मरणाच्या दारातून अगदी सुखरूप घरी आणले. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. आर्थिक परिस्थिती नसली तरी आईच्या प्रेमापोटी त्याने आपल्या आईला को’रो’ना’वर मात करीत बरे केले. सकारात्मकता आणि प्रबळ इच्छाशक्ती असली तर को’रो’ना’सारख्या आजारावरही सहजपणे मात करता येते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मीना पाटील. आपली मिळकत तुटपुंजी असली तरी आईला मानसिक आधार देत थेट मृत्यूच्या दारातून आपल्या आईला सुखरूप परत आणले, त्या निलेश पाटीलला आणि त्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला सलाम !

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *