आई बनायच्या आधी ‘मावशी ‘ बनणाऱ्या मुलींना मातृत्व दिवसाच्या शुभेच्छा…  

आई बनायच्या आधी ‘मावशी ‘ बनणाऱ्या मुलींना मातृत्व दिवसाच्या शुभेच्छा…  

दुधापेक्षा जास्त दुधावरची साय सर्वांना आवडते…
असच काही सुंदर नाते असते, मावशी आणि तिच्या बहिणीच्या त्या लेकरांचे… मूल जन्माला येते तेव्हा, आई आणि बापाची स्थिती काय असते हे जवळपास सगळीकडेच सांगितले जाते, मात्र त्या आईच्या बहिणीची म्हणजेच जन्माला येणाऱ्या मुलाच्या मावशीची अवस्था काय असते..???

संपूर्ण नऊ महिने, आपल्या बहिणीसोबत रोज त्या मुलाची वाढ अनुभवलेली मावशी… नक्की काय असेल, मुलगा कि मुलगी ह्याबद्दल आपल्या बहिणीसोबत भांडण केलेल्या त्या होणाऱ्या मावशीला शेवटचे काही क्षण आपल्या नियंत्रणात ठेवता येत नाही.आपल्या बहिणीला दवाखान्यात दाखल केल्यानंतर, इच्छा असून देखील ती बहीण सोबत नाही राहू शकत. माघे बऱ्याच जबादारी असतात ज्याकडे लक्ष देण्याची गरज असते. बहिणीसोबत आई थांबते, मग घरी वडिलांसोबत व घर सांभाळण्याची मोठी जबाबदारी त्या मावशीवर येते… लहान आहे, म्हणून कधीच संपूर्ण घराची जबाबदारी घेण्याची न पडलेली ती बहीण अचानक मोठी होते. संपूर्ण घर चार-चार वेळा स्वछ करते…

स्वतः आईला दर पंधरा-वीस मिनिटांत फोन करणारी ती बहीण, आपला फोन कधी वाजतो ह्याकडेच संपूर्ण लक्ष लावून असते. अचानक फोन वाजतो, मुलगा होणार कि मुलगी ह्याबद्दल विचार करत इतक्या वेळ बेचैन असलेली ती बहीण सर्वात पहिले आपल्या आईकडे स्वतःच्या बहिणीच्या तबियतीबद्दल नकळत विचारते. मुलगा पाहिजे किंवा मुलगी पाहिजे ह्याबद्दल होणाऱ्या बाळाची आई, वडील, आजी आजोबा ह्या सर्वांना चिंता असते… मात्र त्या मावशीला फक्त आपण मावशी झालो ह्याचाच आनंद असतो…

आजपर्यंत घरातील लहान मुलगी असल्यामुळे, फक्त आई व बहीण बोलतील तसेच घर सांभाळणे किंवा पाहुण्यांचे काम करणे इतकेच करणे तिला माहित होते. मात्र तरीही, नव्याने मावशी बनलेली ती येणाऱ्या सर्व पाहुण्यांचे आवभगत, जेवण आणि पाहुणचार अगदी उत्तम पद्धतीने करते. घर आणि दवाखान्यात लागणाऱ्या सर्व गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवते…

घरी आल्यावर देखील, कित्येक दिवस आपले मन मारुन ती मावशी छोट्या पिल्ल्याला आपल्या कुशीत घेत नाही. आपल्याला छोट्या बाळाला घेता येत नाही, मग आपल्यामुळे त्या छोट्याला त्रास होईल म्हणून ती त्याला आपल्या कुशीत घेत नाही… मग अचानक धाडस करते आणि, एक दिवस त्या बाळाला आपल्या कुशीत घेते. जी मायेची ऊब, जे प्रेम आपल्या आईकडून मिळतो अगदी तीच ऊब, तेच प्रेम आणि तोच स्पर्श त्या छोट्या बाळाला आपल्या मावशी कडून मिळतो…

आई पेक्षाही जास्त, मावशीला त्या छोट्या लेकराचा प्रत्येक क्षण कैद करुन ठेवायचा असतो… ती आईपेक्षाही जास्त त्या बाळाच्या आठवणी आपल्या जवळ जपून ठेवते.

लेकरांना बिघडवण्यात, मावशी सगळ्यात जास्त पुढे असते… हे पूर्णपणे खोटे पण नाही, कोणतीही गोष्ट आपल्याला पाहिजे असेलच तर सगळ्यात आपल्या मावशीला ते लेकरू मागते. त्याला माहित असते, आई-बाबा नाही म्हणू शकतात मात्र, आपल्या मावशीकडे नाही बोलण्याचा पर्याय पण नाही आणि ती बोलणार पण नाही… त्यामुळे जे पाहिजे आणि जे हवे आहे, ते मावशी आपल्या लेकराला घेऊन देतेच….

जेव्हा लेकराची काळजी करण्याची बाब येते ती आई बनते, जेव्हा हट्ट पुरवण्याची बाब येते ती आजी-आजोबा बनते, जेव्हा समजून घेण्याची बाब येते ती सगळ्यात चांगला मित्र बनते, जेव्हा सर्वात जास्त मस्ती करण्याची बाब येते ती वडील बनते… ती असते मावशी, पण त्या लेकरासाठी नकळत सर्व पात्रांची भूमिका ती पार पाडते…

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *