आज चंद्रग्रहण झाल्यावर आपल्या घरातील ‘या’ २ वस्तू दान केल्याने ‘अडथळे’ होतील दूर, लगेच अनुभवाल बदल..

आज चंद्रग्रहण झाल्यावर  आपल्या घरातील ‘या’ २ वस्तू दान केल्याने ‘अडथळे’ होतील दूर, लगेच अनुभवाल बदल..

ग्रहण म्हणलं कि आधीच आपले मन धास्ती घेते. याबद्दल अनेक समज-गैरसमज आपल्या समाजात आहे.ग्रहण म्हणजे वाईट काळ असाच विचार आपण करतो. मात्र, प्रत्येक वाईट काळासाठी लढण्यासाठी काही उपाय आपल्या हिंदू शास्त्रामध्ये लिहू ठेवले आहेत.

मात्र याबद्दल अज्ञान असल्यामुळे आपण केवळ ग्रहण काळ किंवा इतर राहुकाळ वगैरे ला घाबरून जातो. पण, या देखील योग्य प्रकारे ईश्वराची आराधना केल्यास हा काळ देखील शांतीपूर्ण पद्धतीने टळतो. काही खबरदारी आणि ईश्वराची अर्चना यामुळे सकारत्मक ऊर्जा प्राप्त होते. सकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यात असेल, तर आपण नेहमी कोणतेही काम करण्यासाठी उत्साहित राहतो. श्रम करण्यासाठी माघे हटत नाही, त्यामुळे आपल्याला नक्कीच यश मिळते.

आज चंद्रग्रहण आहे.या वर्षी चंद्रग्रहण वृश्चिक लागत आहे. त्यामुळे त्या राशींच्या लोकांनी खास करुन, हानीकारक ठरण्याचे संकेत आहेत. त्यामुळे त्यांनी विशेष लक्ष ठेवणे महत्वाचे आहे. या राशीच्या लोकांच्या प्रकृतीवर देखील विपरीत परिणाम होण्याचे संकेत आहेत त्यामुळे त्यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

या ग्रहण काळात महादेवाची उपासना करणे सर्वच व्यक्तींसाठी अगदी फायद्याचे ठरेल. महादेवाने चंद्राला धारण केलेलं आहे. कोणत्याही ग्रहण काळात महादेवाची उपासनाच सगळ्यात उत्तम असते. महादेवाच्या रुद्र रूपाचे आणि मंत्राचे उच्चारण या काळात तुम्हाला येणाऱ्या संकटापासून दूर ठेवते. त्यामुळे शिवचालिसा किंवा रुद्रमहिमा चे ग्रहणकाळात पठण करावे.

ग्रहण दुपारी २ वाजता सुरु होऊन रात्री ७ वाजता संपणार आहे. त्यामुळे ग्रहण संपल्यानंतर, स्नान करून काही खास वस्तूंचे दान करावे. आपल्या घरात असलेल्या धान्याच्या १० टक्के भाग गरजूंना दान करावा. धान्य म्हणजे गहू, ज्वारी, तांदूळ इ. यापैकी कोणत्याही एका धान्याच्या १० टक्के भाग ग्रहण पूर्ण झाल्यानंतर दान करावा. यामुळे लक्ष्मी ची कृपा होऊन, तुमच्या घरात कधीच अन्नाची कमतरता होणार नाही.

त्याचबरोबर, ग्रहण काळ संपल्यानंतर आपल्या चपला दान कराव्या. चपला दान करताना अजून एक नवीन जोड शक्य असल्यास त्यासोबत द्यावा. आपल्या चपला दान केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील कामात येणारे अडथळे, किंवा शिक्षणात निर्माण झालेली समस्या त्वरित दूर होईल. नवीन मार्ग सापडतील.

चंद्रग्रहण संपल्यानंतर स्नान करून घ्यावे. त्यानंतर, विष्णूची आराधना कारवी. आलेले सर्व संकट तू दूर कर अशी विनंती विष्णूकडे करावी. आजच्या ग्रहणकाळात महादेवासोबतच लक्ष्मी देवीची देखील पूजा करावी. आज लक्ष्मीची अर्चना केल्यानंतर, धनप्राप्तीचे उत्तम संकेत आहेत. ग्रहण संपल्यानंतर देखील विष्णूची उपासना करताना लक्ष्मीची अर्चना करावी. ग्रहणकाळात देवाची केवळ आराधना, पाठ आणि मंत्रउच्चार करावे. कोणत्याही देवाला स्पर्श करणे टाळावे.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *