कमी मार्क मिळाले म्हणून, शाळेतून काढून टाकलेला मुलगा IPS झाला; वाचा पोलीस उपायुक्त आकाश कुल्हारींची प्रेरक कथा

प्रत्येक पालकांची इच्छा असते, आपल्या मुलांनी उत्तम शिक्षण घ्यावं, त्यानी चांगल्या करियर ची निवड करावी. आपले उंच ध्येय ठेवावे आणि ते गाठण्यासाठी शर्तीने प्रयत्न करावे. त्यासाठी पालक देखील दिवस रात्र एक करून आपल्या मुलांना सहकार्य करतात. त्यांना उत्तम कोचिंग मिळावी, त्यांना ध्येय गाठत असताना कोणताही बाधा येऊ नये असे आपले खबरदारी घेतात. काही पालक त्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावतात.

हे बघून आपल्या पालकांच्या अपेक्षेचे ओझे पाल्यावर येते. आणि अश्या वेळी १०-१२ च्या महत्वपूर्ण परीक्षेत टेन्शन मुले पाल्य हवे तसे मार्क मिळवण्यात अपयशी देखील ठरतात. मात्र, १० आणि १२ च्या वर्गात पाल्यांना उत्तम मार्क मिळावे , चांगल्या कॉलेजात त्यांचा प्रवेश व्हावा आणि उत्तम करियर व्हावे अशी सर्वांचीच इच्छा असते. आपल्या समाजात काही अशी उदाहरणे आहेत की ज्या मुलांना अर्थिक आधार,कौटुंबिक आधार, चांगले, दर्जेदार शिक्षण आदी गोष्टींचा अभाव असूनही अशा मुलांनी प्रयत्न, जिद्द आणि कष्टाच्या जोरावर मोठं यश मिळवलं आहे.

एक अशीच प्रेरणादायी कहाणी सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनत आहे. एक मुलगा ज्याला कधीच उत्तम मार्क मिळाले नाही, मात्र आपल्या प्रयत्नांच्या आणि जिद्दीच्या जोरावर आज तो एक आयपीएस ऑफिसर आहे. आकाश कुल्हारी असे त्या मुलाचे नाव आहे..

आकाश ला कमी मार्कस मिळतात म्हणून शाळेने काढून टाकले. परंतु, आज हाच मुलगा कष्टांच्या जोरावर आयपीएस झाला आहे. मूळचे राजस्थान येथील असणारे आकाश कुल्हारी बिकानेर जिल्ह्यातील आहेत, त्यांचे वडील पशुवैद्यक होते. बिकानेर शहरातील बिकानेर सीबीएसई स्कूलमधून त्यांच्या शालेय शिक्षणास सुरुवात झाली. दहावीला १९९६ मध्ये त्यांना केवळ ५७ टक्के मिळाले होते, पहिला प्रयत्न कमकुवत ठरल्यानं आणि कमी मार्क मिळाल्यानं त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलं. ते अगदी सामान्य विद्यार्थी होते आणि १० चा चा निकाल पाहून मला शाळेतून काढून टाकण्यात आलं. पण या घटनेमुले त्यांचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास जागृत झाला आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी थेट आयपीएस पर्यंत भरारी घेतली.

अथक परिश्रम घेत त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना बिकानेर केंद्रीय विद्यालयात प्रवेश मिळवून दिला.मग अगदी कठोर मेहनत करत आकाश ह्यांनी इंटरमिजिएट परीक्षेत ८५ टक्के गुण मिळवले. दुग्गल महाविद्यालयातून २००१ मध्ये पुढील शिक्षण त्यांनी घेत कॉमर्समध्ये पदवी मिळवली. जेएनयू दिल्ली येथील स्कूल ऑफ सोशल सायन्सेसमध्ये एम.कॉम केले आणि याच दरम्यान त्यांनी सिव्हील सर्व्हिस परीक्षांचा अभ्यास सुरु केला. २००५ मध्ये त्यांनी एम.फील पूर्ण केले.

आणि २००६ मध्ये मार्क कमी मिळाले, म्हणून शाळेतून काढून टाकण्यात आलेला एक सर्वसाधारण विद्यार्थी आकाश , सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा पास झाले. अभ्यासापेक्षा खेळण्यात त्यांनी सुरुवातीला जास्त लक्ष दिले असे ते स्वतःच बोलतात. पुढे ते सांगतात पदवी घेण्यापूर्वी त्यांच्यापुढे कोणतेही लक्ष्य नव्हते. परंतु,त्यानंतर त्यांनी आपले लक्ष्य ठरवले आणि त्यात यश मिळवले.

कष्ट आणि जिद्द असेल तर असाध्य गोष्ट साध्य होते हेच, त्यांच्या ह्या कहाणीमधून त्यांनी दाखवून दिले आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *