याला म्हणतात मैत्री ! रक्ताच्या नात्यांनी फिरवली पाठ ४०० किमी अंतराहून येऊन मुस्लिम मित्राने दिला अग्निडाग…

याला म्हणतात मैत्री ! रक्ताच्या नात्यांनी फिरवली पाठ ४०० किमी अंतराहून येऊन मुस्लिम मित्राने दिला अग्निडाग…

सध्या पूर्ण महामारीचा उद्रेक हा आपल्या देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की, दिवसागणिक काही हजारांमध्ये लोक आता मृत्युमुखी पडत आहेत. या महामारी ने आपली लोक देखील दूर नेले आहेत. कोणी कोणाला सध्या भेटत नाही. ही महामारी आता कधी संपते याचीच वाट सगळे पाहत आहेत.

मात्र, काही असे मित्र, समाज व संस्था आहेत की जे कोरोना याला दूर सारून देखील गरजू लोकांना मदत करत आहेत. तसेच त्यांच्या नातेवाईकांना मदत करत आहेत. मात्र, समाजाच्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये असे काही घटक आहेत की ज्यांना कोरोना झाला आहे, त्यांना वाळीत टाकण्याचा प्रकार सुरू आहे. कोरोना झाला म्हणजे एखाद्या व्यक्तीला वाळीत टाकावे, असे काही नसते.

मात्र, अनेक जण या आजाराला खूप घाबरत आहेत. एखादा आजार आपल्याला झाला असेल तर त्यातून बाहेर देखील आपल्याला निघता येते. आपला मेंदू हा एवढा तल्लख असतो की, एखादा आजाराविषयी आपण आपल्या मेंदूमध्ये संकल्पना केली आणि आपल्याला हा आजार होईल की काय, असे वाटायला लागले. तर आपल्याला त्या प्रकारची लक्षणे हे दिसत असतात. त्यामुळे आपल्या मेंदूमध्ये असे विचार कधीही येऊ देऊ नये.

आपण सकारात्मक विचार केला तर आपल्याला असे काही होणार नाही. सध्याच्या कोरोना महामारीमुळे अनेक जणांनी आपल्या आप्तांना गमावले आहे. कोणाचा भाऊ, कोणाची बहीण, कोणाचा पती, कोणाची वडील या आजाराने ग्रासून मृत्युमुखी पडले आहेत. याची लागण सेलिब्रिटी लोकांना देखील खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे.

काही जणांचे या आजाराने निधन देखील झाले आहे. प्रख्यात संगीतकार श्रवण राठोड यांचा देखील काही दिवसांपूर्वीच या आजाराने मृत्यू झाला होता. आताही महामारी रौद्ररूप धारण करत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये तर सरकारने पंधरा दिवसाचा लॉक डाऊन देखील लावला आहे. आपण अशा अनेक घटना वाचल्या असतील की एका हिंदु कुटुंबाने एका मुस्लिम व्यक्तीचे अंत्यसंस्कार केले किंवा एखादा हिंदू व्यक्ती या आजाराने मृत्युमुखी पडला, तर त्याच्या अंत्यसंस्काराला कोणीही त्याची जवळची नातेवाईक येत नाहीत.

अशा वेळेस मुस्लिम लोक या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करतात, अशी बातमी आपण ऐकली असेल. आज आम्ही आपल्याला अशीच एक घटना सांगणार आहोत. ही घटना उत्तर प्रदेशच्या इटावा या शहराजवळ घडली होती. प्रयागराज येथील जयंतीपूर या गावांमध्ये हेमसिंह नावाचे एक व्यक्ती राहत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोणाची लागण झाली होती.

याबाबत त्यांनी त्यांचे मित्र सिराज यांना माहिती दिली. त्यानंतर सिराज यांनी हेम सिंह हे जिथे दाखल होते त्या दवाखान्याचे दोन लाख रुपये बिल हे ऑनलाईन भरले होते. हेम सिंह हे उच्च न्यायालयात जॉईंट रजिस्टर म्हणून कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी त्यांची पत्नी व मुलीचे निधन झाले होते आणि आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोना ची लागण झाली होती.

अशा वेळी त्यांच्याजवळ कोणीही नव्हते. त्यांनी याबाबत सिराज यांना माहिती दिली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी हेमसिह यांचे निधन झाले. याबाबत सिराज यांना माहिती मिळाली. त्यानंतर ते तब्बल चारशे किलोमीटर वर येऊन येथे दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी हेम सिंह यांच्या जवळपास वीस नातेवाईकांना याबाबत माहिती दिली.

मात्र, कोणीही अंत्यसंस्काराला येण्याची तयारी दाखवली नाही. त्यामुळे सिराज यांनी स्वतः हेम सिंह यांना स्मशानभूमीत विधीपूर्वक नेले आणि त्यांचे विधीपूर्वक अंत्यसंस्कार केले. या घटनेची चर्चा माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात झाली. त्यानंतर हेम सिंह यांच्या कुटुंबाला अनेकांनी याचा जाब देखील विचारला. हेम सिंह यांचे लग्न डी जे पी आनंद लाल बॅनर्जी यांच्या बहिणीसोबत झाले होते. दीड वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *