केरोसिन लैंपखाली अभ्यास करत आपल्या गावीच केली यूपीएससी ची तैयारी, तीन वेळा अयशस्वी ठरल्यानंतर…

आयएएस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून, यूपीएससीचे कोचिंग केंद्र मानल्या जाणार्‍या दिल्लीसारख्या महानगरांमध्ये लाखो तरुण पोहोचतात. असे बरेच लोक आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे ते तिथे जाऊ शकत नाही. अशा तरुणांना प्रेरित करणारी ही आणखी एक यशोगाथा आहे. बिहारमधील एका छोट्या खेड्यातील आयएएस अधिकारी अंशुमन राजची ही संघर्षमयी प्रेरणादायी कथा आहे. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा २०१९ क्रॅक करून हा तरुण आयएएस झाला आहे. अंशुमन हा बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील एका छोट्या गावचा आहे.

अंशुमन ह्यांचे मध्यवर्ती शिक्षण आपल्या गावीच झाले. मात्र त्यानंतर ग्रॅज्युएशन त्यांनी कलकत्त्याला केले आणि तिथेच त्यांनी सिव्हिल सेवा परीक्षांची तैयारी सुरु केली. ह्यात सर्वात मोठी बाब ही कि त्यांनी आयएएस बनण्याची तैयारी आपल्या गावी राहूनच केली. कोणत्याही कोचिंग आणि कोणत्याही गायडन्स शिवाय त्यांनी हे करुन दाखवले आहे.

तीन वेळा पदरी आले अपयश
सेल्फ स्टडी च्या जोरावरच अंशुमन ह्यांनी यूपीएससी पास करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी आपल्या गावीच जोमाने तैयारी सुरु केली. मात्र, पहिल्या तीन वेळा त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. तरीही अंशुमन ह्यांनी त्याचा स्वीकार केला आणि अजून जोराने प्रयत्न सुरु केले. कुठे चुकले किंवा कुठे काय कमतरता राहिली ह्याचे आकलन करुन त्यात सुधारणा केली. आणि अखेरीस चौथ्या प्रयत्नामध्ये त्यांना यश मिळालेच. २०१९ च्या परीक्षांमध्ये त्यांनी १०७ क्रमांक पटकावला.

संघर्षमयी प्रवास
अंशुमन ह्यांना, आपले ध्येय गाठण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तीन वेळा पदरात आलेलं अपयश, ह्यामुळे कधी-कधी नैराश्य येत असे. मात्र त्यावर त्यांनी मोठ्या खुबीने मात केली. बऱ्याच वेळा गावी लाईट्स जात असे, तेव्हा अक्षरशः केरोसिन लैंप घेऊन त्यांनी अभ्यास केला मात्र, हार मानली नाही. आपले प्रयत्न सुरु ठेवले आणि त्यांना यश मिळालेच.

अंशुमन ह्यांच्या यूपीएससी ची तैयारी करणाऱ्यांसाठी काही महत्वाच्या टिप्स

– योग्य स्टडी मैटेरियल मधून तैयारी करा.
– अभ्यास करताना छोट्या -छोट्या टिप्स च्या नोट्स बनवा, म्हणजे रिविजन करताना सोपे पडेल.
– नियमितपणे वर्तमानपत्र वाचत रहा.
– आत्मविश्वास सोडू नका.
– स्टैंडर्ड पुस्तके वाचत राहा.
– फैक्ट्स च्या माघे जास्त धावत बसू नका, एखाद्या गोष्टीप्रमाणे त्यांचा अभ्यास करा.

हे केल्यास कुठे पण राहून आणि कोणत्याही क्लास शिवाय ततुम्ही स्वबळावर यश प्राप्त करू शकता. अंशुमन ह्यांची ही यशोगाथा सर्वाना प्रेरणा देणारी आहे. आत्मविश्वास आणि कष्ट केल्याने यश नक्कीच मिळते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *