कोविड लढ्यासाठी बिग बी कडून कोट्यवधीची मदत…!

कोविड लढ्यासाठी बिग बी कडून कोट्यवधीची मदत…!

को’रो’नाच्या महामारीने संपूर्ण जगात हाहाकार मांडला आहे. आपल्या देशात मात्र को’रो’नाच्या महामारीमुळे संपूर्ण परिस्थती अतिशय जास्त गंभीर आणि भयानक अशी झाली आहे. ह्यामध्ये, संपूर्ण देश होरपळून निघत आहे. पहिल्या लाटेपेक्षा अजूनच भयंकर अशी ही दुसरी लाट माघील काही आठवड्यांपासून संपूर्ण देशात मृत्यूचे थैमान मांडून आहे.

देशभरात को’रो’ना’च्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप अद्यापही कायम आहे. त्यातच को’रो’ना’बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तसेच अनेक को’रो’ना’बाधितांना ऑक्सिजन, औषधे आणि बेड मिळत नाही आहेत. अशातच अनेकजण गरजूंच्या मदतीला धावून आले आहे. को’रो’नाच्या कठीण काळात अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला. कोणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या तर कोणी आर्थिक मदत केली.

अभिनेता सोनू सूद ह्यासर्वांमधे पुढे आहे, तो को’रो’ना’च्या पहिल्या लाटेपासूनच जनसेवेमधे अग्रेसर दिसत आहे. त्याचबरोबर सलमान खान हा गरजूंना अन्न पुरवत आहे आणि सोबतच बॉलिवूडमधील काही गरजूंच्या बँकेच्या खात्यावर डायरेक्ट पैसे टाकत आहे.विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ह्या जोडप्याने देखील मागच्याच आठवड्यात सर्वांना पुढे येऊन ह्या संकटसमयी मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्याआधी विराट कोहली ने, काही ऑक्सिजन सिलेंडरचा देखील पुरवठा केला होता.

को’रो’ना व्हायरस विरुद्धच्या लढ्यात आता बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देशाची मदत केली आहे.बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन Amitabh Bachchan यांनी दिल्लीतल्या रकब गंज गुरुद्वारामधील को’व्हि’ड केअर सेंटरसाठी Covid Care दोन कोटी रुपयांची मदत केली आहे. दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष मंजिंदर सिंग सिरसा यांनी याबाबतची माहिती दिली.

दिल्ली को’वि’ड सेंटरसाठी अमिताभ बच्चन यांनी २ कोटी रुपयांची मदत केली आहे अशी माहिती दिल्लीच्या शीख गुरुद्वारा मॅनजमेंट कमिटीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी आपल्या अधिकृत ट्विटरच्या अकाऊंट वरुन ट्वीट करत, ‘अमिताभ बच्चन यांनी श्री गुरु तेग बहादुर को’वि’ड केअर फॅसिलिटीकरिता २ कोटी रुपयांची मदत केली आहे. अमिताभ हे मला रोज फोन करुन तेथील सुविधा आणि आवश्यकता बद्दल विचारणा देखील करत आहेत’ असे त्यांनी सांगितले आहे.

रकब गंज गुरुद्वारामधील को’व्हि’ड सेंटर सोमवारपासून सुरू होत आहे. या सेंटरमध्ये ३०० बेंड्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, डॉक्टर्स, अॅम्ब्युलन्स इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. को’रो’ना रुग्णांसाठी या सर्व सुविधा मोफत असतील.

रविवार बिग बींनी ट्विटरच्या माध्यमातून संपूर्ण जगाला भारताची मदत करण्याची विनंती केली. ‘माझा देश भारत हा को’रो’ना’च्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. एक नागरिक म्हणून मी जगाला विनंती करतोय की त्यांनी भारताची मदत करावी’, असं ते म्हणाले.

त्यानंतर मनजिंदर सिंह ह्यांनी अजून एक ट्विट केले, ‘अमिताभ बच्चन नेमीचं आम्हाला बोलतात की, पैशाची तुम्ही अजिबात चिंता करू नका आणि जास्तीत जास्त लोकांचे जीवन वाचवण्याचा प्रयत्न करा! त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली आहे आणि आता आपल्या ट्विट मधून इतरांना देखील ह्यासाठी प्रवृत्त करत आहे. सध्या ह्यची अत्यंत जास्त आवश्यकता आहे.’

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *