कौतुकास्पद ! पाकिस्तानमध्ये पहिल्यांदा एक हिंदू मुलगी बनली असिस्टंट कमिश्नर, वाचा सना रामचंदचा प्रवास…

कौतुकास्पद ! पाकिस्तानमध्ये पहिल्यांदा एक हिंदू मुलगी बनली असिस्टंट कमिश्नर, वाचा सना रामचंदचा प्रवास…

हिंदूंसोबत हिंसाचाऱ्याच्या पाकिस्तानातील अनके घटना कित्येक वेळा समोर आल्या आहेत, ज्यामुळे संपूर्ण जग अक्षरशः सुन्न झालंय. या विषयावर जगभरात चर्चा होते.काही वर्षांपूर्वी तर तिथल्या टीव्ही प्रोग्रॅममध्ये हिंदूंवर शिवराळ भाषेत टिप्पणी देखील करण्यात आली होती. पाकिस्तानमध्ये हिंदूवर अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत राहिल्या आहेत.

तिथे हिंदूंना अतिशय तुच्छ मानलं जात. त्यांच्यावर शेलक्या शब्दात टीका देखील केली जाते. त्यांना खूप वेळा त्रास दिला जातो. त्यांची प्रचंडप्रमाणात हेळसांड केली जाते. या सऱ्या घटना ताज्या असतानाच पाकिस्तानात एका हिंदू तरुणीचं मात्र तोंडभरून कौतुक केलं जात आहे. या तरुणीने नेमकं असं काय केलं की, संपूर्ण पाकिस्तान तिच्या कामाचं कौतुक करत आहे आणि पाकिस्तानमध्ये सध्या तिचीच चर्चा होत आहे…

डॉक्टर सना रामचंद असं पाकिस्तानातील या हिंदू तरुणीचं नाव आहे. ही तरुणी नुकतीच CSS 2020 ची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. पाकिस्तानात सना ही पहिली हिंदू महिला आहे, जी चक्क असिस्टंट कमिश्नर बनली आहे. तिच्या ह्या यशाबद्दल संपूर्ण पाकिस्तान मधून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तिच्यावर सुरु असलेला ह्या कौतुकाचा वर्षाव बघितल्यानंतर एक गोष्टी प्रखरपणे जाणवत आहे की, एखाद्याला यश आलं की त्या व्यक्तीच्या आयुष्याचा वणवास संपतो. ती व्यक्ती प्रत्येकाला आपलाशी वाटते. त्या व्यक्तीप्रती अनेकांना आपुलकी वाटते. याच कारणामुळे हिंदू-मुस्लिम हा भेद विसरुन चक्क पाकिस्तानचे नागरिक आज सनाच्या मेहनतीचं आणि कामाचं प्रचंड कौतुक करत आहेत.

सना सांगते, ‘मी यशस्वी होणार, अशा विश्वास होता’
“मला मिळालेल्या यशाबद्दल मी अत्यंत आनंदी आहे. मला मिळालेलं हे यश मला आश्चर्यचकीत करणारे अजिबात नाही. कारण मी तेवढीच मेहनत देखील घेतली होती. त्यामुळे मी यशस्वी होईल हे निश्चित होतं. मला लहानपणापासून शिक्षणात यश येत गेलंय. मी नेहमी शाळेत पहिल्या क्रमांकच पटकवायची. FCPS परीक्षेत देखील मी मेरीटमध्ये आली होती. त्यामुळे CSS परीक्षा उत्तीर्ण होणार, असा मला ठाम विश्वास होता”, अशी प्रतिक्रिया सनाने एका वृत्तवाहिनीला दिली आहे.

पाकिस्तान मधील हिंदू समुदायाकडून सनाचं कौतुक
सनाने कोणत्याही शिकवणी आणि क्लास शिवाय हे यश मिळवलं आहे. ती कराची इथे राहत आहे. तिने फक्त मुलाखतीसाठी शिकवणी लावली होती, असंदेखील तिने सांगितलं. तिला मिळालेल्या ह्या यशामुळे तिच्या कुटुंबात अगदी आनंदाचं वातावरण आहे. दुसरीकडे पाकिस्तान मधील हिंदू समाजही तिचं कौतुक करत आहे. कारण पाकिस्तानात खूप कमी हिंदू महिलांना यश संपादित करण्यात यश आलेलं आहे. सनाचं सोशल मीडियावर देखील कौतुक केलं जात आहे.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *