गौरवशाली ! रायगडाच्या झोपडीत निजला छत्रपती, कारण ऐकून वाटेल छ संभाजीराजेंचा अभिमान..!

गौरवशाली ! रायगडाच्या झोपडीत निजला छत्रपती, कारण ऐकून वाटेल छ संभाजीराजेंचा अभिमान..!

खा छ संभाजीराजे ह्यांचे गडप्रेम संपूर्ण राज्याला ठाऊक आहे. त्यांना आपण कित्येक वेळा निवांत क्षणी गड-किल्ले चढताना आणि त्यांचा सान्निध्यात आनंद लुटताना पहिले आहे. नुकतेच छत्रपती संभाजीराजे ह्यांचे काही फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहेत.. खूप काही दडलेलं आहे, छत्रपतींच्या ह्या फोटोंमध्ये…

सोशल मीडियावर सध्या छत्रपती संभाजीराजे यांचा एक फोटो जबरदस्त व्हायरल होतोय. हा फोटो पाहून सुरुवातीला तुम्हाला धक्का बसेल. कदाचित तो फोटो तुम्हाला चांगलाच बुचकळ्यातही पाडेल. फोटोतील व्यक्ती संभाजीराजे तर नाहीत ना ? नक्कीच असा विचार तुमच्या मनात येऊन जाईल. फोटो निरखून बघितल्यावर फोटोतील व्यक्ती नक्कीच संभाजीराजे हेच आहेत,ह्या मतावर तुम्ही अगदी ठाम व्हाल. त्यानंतर संभाजीराजेंच्या या साधेपणाचा तुम्हाला कौतुक आणि अभिमान देखील वाटेल.

एक राजघराण्याचा माणूस, छत्रपतींचा वंशज जेव्हा रायगडाच्या एका झोपडीत विसावा घेतो, तेव्हा ते दृश्य बघून रयत म्हणून मराठा म्हणून, अभिमान वाटणं हे साहजिकच आहे. सध्या संभाजीराजेंचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

संभाजीराजे आज सकाळी रायगडावर तेथे सुरु असलेल्या कामकाजाची पाहणी करण्याकरिता गेले होते. ते दुपारी १२ वाजेच्या सुमारास गडाच्या पायथ्याशी पोहोचले. त्यांनी गडावरील कामकाजांची संपूर्ण पाहणी केली. सध्या गडावरील रोप वे बंद आहे. त्यामुळे संभाजीराजे ह्यांनी स्वतः पायऱ्या चढूनच सर्व कामांची पाहणी केली. डोक्यावर आग ओकणारा सूर्य आणि रायगड सर करुन संभाजीराजे थकले. आणि त्यांनी चक्क रायगडावर असलेल्या एका झोपडीत थोडावेळ आराम केला. यावेळी त्यांनी अगदी सर्वसामान्यांप्रमाणे जमिनीवर झोपूनच विश्रांती घेतली.

संभाजीराजे यांचा रायगडावर एका झोपडीत विश्रांती करत असल्याचे क्षण त्यांचे स्वीय साहाय्यक केदार योगेश यांनी कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला. “राजे हा फोटो लाखों लोकांच्या काळजाचा विषय झाला आहे. सर्वसामान्य माणसामध्ये रमणारा राजा माणूस. गडकोटांच्या रक्षणाचा ध्यास घेऊन सतत कार्यरत असणारे राजे महाराष्ट्राने पाहिले. उन्हाच्या काहीलीमुळे थकून रायगडाच्या झोपडीच्या आश्रयाने थोडीशी विश्रांती घेताना पाहून राज्यातील जनता सुखावली”, असं केदार योगेश म्हणाले.

संभाजीराजे यांनी देखील आपल्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवर या दौऱ्याबाबत संपूर्ण माहिती दिलीय. या माहितीसोबत त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत. “आज सकाळी कोल्हापूरहून रायगडास निघालो. साधारण १२ वाजता गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर नाणे दरवाजामार्गे गड चढून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. लॉकडाऊनमुळे रोपवे बंद आहे, अशा परिस्थितीत प्राधिकरणाचे अधिकारी दररोज गड पायी चढतात. रखरखत्या ऊन्हात देखील गडावरील सर्व कामे अविरतपणे सुरू आहेत. रायगड प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग घेत असलेल्या मेहनतीस प्रोत्साहन देण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो. वेळोवेळी रायगडास भेट देऊन सुरू असलेल्या कामांवर लक्ष देत असतो”, असं संभाजीराजे ट्विटरवर म्हणाले आहेत.

आपल्या छत्रपतींचा असा साधेपणा आणि जमिनीशी जवळीक बघून सर्वच जण अगदी भारावून गेले आहेत. खा संभाजीराजे ह्यांनी अगदी सर्वसामान्य जनतेप्रमाणे आपल्या मातीवर झोपून विश्राम घेणे म्हणजे ह्या मातीबद्दलचे प्रेम आणि अभिमान असणारा असा तो क्षण आहे.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *