चुकूनही आपल्या घरात हे फोटोज लावू नका, स्वतःच द्याल दुर्भाग्याला निमंत्रण…

चुकूनही आपल्या घरात हे फोटोज लावू नका, स्वतःच द्याल दुर्भाग्याला निमंत्रण…

आपण सदैव आपल्या घरात प्रसन्न असे वातावरण रहावे ह्याची आपण सर्वच खबरदारी घेतो. कधी सुंदर फुले, तर कधी सुगंधित अगरबत्ती ह्यामुळे आपण सतत आपले घर ताजे आणि प्रसन्न ठेवण्यात आपल्याला मदत मिळते. आणि नेहमीच आपण आपल्या घरात वातवरण उत्तम ठेवतो.

आपले घर प्रसन्न आणि ताजे असेल तर, आपल्याला देखील आनंदित आणि प्रसन्न वाटते. मात्र आपण कधी कधी चुकून आपल्या घरात अश्या काही वस्तू घेऊन येतो, ज्यामुळे आपल्या घरात स्वतःच दुर्भाग्य घेऊन येतो. त्यापैकी एक आहेत फोटोज, आपण खूप आवडीने वेग-वेगळ्या प्रकारचे फोटोज स्वतःच्या घरात लावतो. मात्र, ते फोटोज आपल्या घरावर विपरीत परिणाम करू शकतात ह्याबद्दल आपण विचार देखील नाही करत.

हिंसक प्राण्यांचे फोटोज

सिंह, वाघ आणि कोल्हा असे हिंसक प्राणी आपल्या सर्वांनाच आवडतात.कधीच आपल्या घरात, कुठेच हिंसक प्राण्यांचे फोटोज लावू नका. ह्यामुळे, नात्यांमध्ये अडचणी निर्माण होतात. अश्या हिंसक प्राण्यांमुळे म्हणजेच त्यांच्या फोटोमुळे घरात सतत भांडण आणि वाद सुरूच राहतात.

त्यामुळे अश्या हिंसक प्राण्यांचे फोटोज कधीच आपल्या घरात लावू नका.

ताजमहाल चा फोटो

अलौकिक प्रेमाचे प्रतीक म्हणून आपल्या सर्वांनाच ताजमहाल माहित आहे. हा ताजमहाल शाहजहाँ ने आपली बायको मुमताज हिच्या मृत्यूनंतर, आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून बांधले होते.

मुमताज आणि शाहजहाँ ह्या दोघांचाही मकबरा आहे. मृत्यू आणि त्याच्याशी निगडित वस्तू किंवा फोटो ठेवणे अशुभ समजले जाते. त्यामुळे ताजमहाल चा फोटो आपल्या घरात लावणे देखील अशुभ च ठरते.

नटराज ची प्रतिमा

भगवान शिव यांच्या सर्व रौद्र रूपांपैकी एक नटराजचे रूप आहे. भगवान शिव ह्यांनी नटराज रूप धारण केले तेव्हा प्रलय आलेला होता, त्यामुळे ह्या रुपातील प्रतिमा आपल्या घरात लावू नये. अश्या प्रकारची प्रतिमा म्हणजेच, विनाश आणि प्रलय ह्यांचे प्रतीक मानले जाते. अश्या वेळी, आपल्या घरातील सुख-शांती भंग होऊ शकते म्हणून नटराज ची प्रतिमा आपल्या घरात असू नये.

वाहत्या धबधब्याचे चित्र

एखाद्या पर्वतावरून पडणारे नदीचे पाणी अलौकिक असे नैसर्गिक सौंदर्य म्हणून आपण त्याकडे बघतो. मात्र असे नैसर्गिक सौंदर्य असणारे फोटोज आपल्या घराच्या भिंतींवर म्हणजेच घरात कुठेही ठेवू नका. त्यामुळे लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहत नाही. अवास्तव खर्च वाढून धन संपण्यास सुरुवात होते, म्हणून वाहत्या धबधब्याचे चित्र कधीच आपल्या घरात लावू नका.

सूर्यास्त असलेले चित्र

उगवत्या सूर्याला सर्व नमस्कार करतात,मात्र ज्यावेळी सूर्य अस्त होत असतो त्यावेळी देखील सूर्याचे रूप अगदी लोभनीय असते. परंतु सूर्य अस्त होत असणारा फोटो आपल्या घरात लावणे म्हणजे नैराश्य आणि अवगती ला निमंत्रण देणे ठरते. त्यामुळे सूर्य अस्ताचा फोटो कितीही नैसर्गिक सौंदर्य देत असले तरीही तसा फोटो आपल्या घरात लावू नका

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *