ठाकरे, पवारांनी मराठा आरक्षणासाठी घेतली राज्यपालांची भेट, मात्र काय झाले साध्य..

ठाकरे, पवारांनी मराठा आरक्षणासाठी घेतली राज्यपालांची भेट, मात्र काय झाले साध्य..

आज सकाळपासूनच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठा आरक्षण संदर्भात राज्यपालांची भेट घेणार असून त्यांनी ह्या संदर्भात लिहलेलं पत्र थेट राष्ट्रपतींकडे सुपूर्त करावे असे निवेदन करण्यात येणार होत. मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे त्यांच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय जरी निराशात्मक आलेला असला तरीही महाविकास अगदी सरकार हे मराठा समाजासोबत असून त्यांच्यासाठी लढेल असे त्यांनी मत व्यक्त केले होते.

त्याच पार्श्वभूमीवर,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजभवनावर राज्यपालांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्यासंदर्भात राज्यपालांची भेट घेतली. त्या निकालात आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकार कडे नसून राष्ट्रपतींना आणि थेट केंद्र सरकार म्हणजेच पतंप्रधान मोदी ह्यांना आहेत, असं सांगण्यात आलं. आमच्या भावना राज्यपालांना कळवण्यासाठी आम्ही ही भेट घेतली. ह्यावर लवकर तोडगा नाही निघाला तर आम्ही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट देखील घेणार आहे.

राज्याचा अधिकार राज्याकडे असावा, याविषयी चर्चा होण आवश्यक आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना पत्र लिहू असं सांगितलं होतं. त्याप्रमाणं पहिलं पाऊल टाकलं आहे. मराठा समाजानं पहिल्यापासून समजूतदारपणा दाखवलेला आहे,त्यांनी दाखवलेला हा समजूतदारपण कौतुकास्पद आहे.त्यांचा संयम ही मोठी शक्ती आहे हेच त्यांनी दाखवून दिले आहे. मराठा समाजाला आपला लढा राज्य सरकारविरोधात नाही हे माहिती आहे. मराठा समाजानं सामंजस्य दाखवल त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. पुन्हा एकदा सांगतो की, हे सरकार सर्वसामान्यांचा आवाज आहे, त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे.

मराठा आरक्षण कायदा फुलप्रूफ नव्हता
मराठा आरक्षणाचा कायदा फुलप्रुफ नव्हता हे सर्वात पहिले लक्षात घ्या जर, तो असता तर आज राज्यपालांची भेट घेण्याची वेळ आली नसती. आम्ही नुकतेचं पत्र दिलं आहे. त्यावर काय निर्णय येतोय ते पाहावं लागेल. राज्यपाल या विषयाशी सहमत आहेत, असं आता तरी त्यांनी सांगितलं आहे. त्यांच्यामार्फत ते लवकरात लवकर पत्र वर देतील, आम्ही त्याबाबत आवश्यक सहकार्य त्यांना करु, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

खा छ संभाजीराजे माघील एक वर्षांपासून, मा पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्याकडे मराठा आरक्षण बद्दल चर्चेसाठी वेळ मागत आहेत, मात्र सरळपणे पाठ दाखवण्यात आली. आता दिलेल्या पत्रावर लवकरात लवकर उत्तर येण्याची आशा आहे, आणि मराठा आरक्षण संदर्भात आम्ही पंतप्रधानांना जाऊन भेटणार आहोत. त्यांच्या भेटीची वेळ घेऊ आणि त्यांना भेटू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *