ताज पॅलेस हॉटेलचा खरा शिलेदार; महाराजा सयाजीराव गायकवाड…

ताज पॅलेस हॉटेलचा खरा शिलेदार; महाराजा सयाजीराव गायकवाड…

महाराजा सयाजीराव गायकवाड हे अत्यंत विलक्षण व्यक्तिमत्वाचे धनी होते. आपला जन्म कोणत्या घरात व्हावा हे कदापि आपल्या हातात नसतं. मात्र त्या घराचं, समाजाचं आणि संपूर्ण देशाचं भविष्य उज्ज्वल करणं हे सर्वोपरी आपल्याच हातात असतं… असे उदात्त विचार असणारा नवविचारांचा, क्रांतदर्शी, स्वाभिमानी, उमदा, प्रयोगशील, उदार आणि सुसंस्कृत राजा म्हणून त्यांचा परिचय आपल्या इतिहासात दिला आहे…

बडोद्याचे संस्थानिक महाराजा सयाजीराव गायकवाड, हे गुणांची पारख करण्यात अत्यंत पारंगत होते. गुण आणि प्रबळ इच्छाशक्तीला योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले तर, इतिहास घडतो असे उद्दात विचार त्यांचे होते. आणि म्हणूनच कित्येक कलाकार, साहित्यिक, प्रकाशक, शैक्षणिक, शेती क्षेत्र, सामाजिक सुधारणा, न्याय आणि औद्योगिक कंपन्यांना घडवण्याचे कार्य त्यांनी केले… कदाचित हे वाचून आश्चर्य वाटेल की, संपूर्ण जगात ज्या ‘टाटा कंपनी’ने ख्याती मिळवली आहे, सुरुवातीच्या काळात त्यांना हातभार लावणारे महाराजा सयाजीरावच होते…

थक्क करणारा प्रवास

सयाजीराव गायकवाड यांचा जन्म ११ मार्च १८६३ रोजी एका गरीब शेतकऱ्याच्या घरात झाला होता. अनेक राजांनी गरिबी पाहिली होती, मात्र महाराजांनी गरिबी अनुभवली होती. गोपाळ हे त्यांचं बालपणाचं नाव होतं. ‘गोपाळ काशिराव गायकवाड’ असे त्यांचे पूर्ण नाव होते. त्यांच्या घराण्याचा संबंध बडोद्याच्या राजघराण्याशी होता आणि म्हणूनच बडोद्याच्या महाराणी जमनाबाई ह्यांनी त्यांचे पती महाराज खंडेराव गायकवाड यांच्या निधनानंतर राजगाधीसाठी छोट्या गोपाळला दत्तक घेतले. २७ मे १८७५ रोजी बडोद्यास राज्यभिषेक समारंभ आटोपला आणि बाळराजांचे नाव सयाजीराव ठेवण्यात आले

नाशिक जिल्ह्यातील छोट्याशा कवळाणा गावचा, शेतकऱ्याचा बारा वर्षांचा गोपाळ चक्क बडोद्याचा राजा बनतो. राजा बनल्यानंतर अक्षरओळख आणि राज्यकारभार मोठ्या आवडीने शिकतो. चिकाटी, जिज्ञासा अन् वेगळं काही करायचे, या ध्यासातून आधुनिक भारताचा जणू एक ‘शिल्पकार’ बनतो. असा सयाजीराव गायकवाड महाराजांचा प्रवास अगदी थक्क करणारा आहे.

देशातील जवळपास सर्व युगपुरुषांना सढळ हाताने मदत

देशभरातील जवळपास सर्वच युगपुरुषांना ह्या राजाने मदत केली. दादाभाई नौरोजी, पं. मदनमोहन मालवीय, नामदार गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, डॉ बाबासाहेब आंबेडकर ,गंगारामभाऊ म्हस्के, राजाराम बापू पाटील, अण्णासाहेब शिंदे, या आणि आणखी अनेक युगपुरुषांना महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी मदत केली.जोतिबा फुले यांच्या ‘सत्यशोधक समाज’ चळवळीला पाठींबा दिला. त्याचबरोबर महाराजांनी वेळोवेळी आर्थिक साहाय्यही केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याबद्दल तर महाराजांना अतिशय प्रेम आणि आदर होता.

उद्योगपती जमशेदजी टाटांना केलेली मदत, आणि मुंबईचे ताज हॉटेल….

महाराजांनी, जमशेदजी टाटां ह्यांना त्यांचा ‘टाटा केमिकल्स’ कारखाना उभा राहावा, यासाठी भरपूर आर्थिक मदत केली होती. त्याचपणे त्या काळात इंग्रज अधिकारी भारतीय उद्योगपतींना सुरळीतपणे व्यावसाय करू देत नसत. नेहमी या ना त्या कारणाने व्यत्यय आणत असत. जमशेदजी टाटांना महाराज सयाजीराव गायकवाड यांनी ‘टाटा आयर्न अॅन्ड स्टील’ कारखाना सुरू करण्यासाठी आर्थिक मदत तर केलीच पण त्याचबरोबर त्यांचे मनोबल वाढवण्याचे मोठे कार्य देखील केले… एका भारतीय कारखानदाराने आपल्याशी स्पर्धा करावी ही, गोष्ट इंग्रज अधिकाऱ्यांना आणि शेफिल्डमधील कारखानदारांना रूचत नव्हती. परंतू,महाराज सयाजीराव गायकवाड जमशेदजींच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे असत, त्यांनी नेहमीच टाटांना धीर दिला. जमशेदजी टाटांना महाराजांविषयी खूप कृतज्ञता होती.

प्रसिद्ध उद्योगपती जमशेदजी टाटा आणि महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या दोघांमध्ये केवळ घट्ट मैत्रीच नव्हती तर त्या दोघांमधे उत्तम असे जिव्हाळ्याचे संबंध होते. महाराज नेहमीच कामानिमित्य विदेशात विशेषत: युरोपीय देशांमध्ये जात असत.एक वेळेची त्यांची ही ट्रिप जमशेदची टाटा सोबत होती. ते दोघे सोबत पॅरिस मध्ये गेले होते… त्या दोघांच्या पॅरिस भेटीबद्दलची गोष्ट प्रसिद्ध टाइम्स मॅगझीन मध्ये देखील रेखांकित केलेली आढळून येते.

तेथील आवाढव्य, विशाल आणि आकर्षित खानावळी, भव्य वास्तू पाहूण आपल्याही देशात असे वास्तू असावेत अशी इच्छा खूप दिवसांपासून महाराज सयाजीराव गायकवाड ह्यांच्या मनात होती. मोठी खानावळ असावी आणि आपल्या देशातील गरिबांनाही त्याचा उपभोग व्हावा असे महाराजांना वाटत असायचे. पॅरिस भेटीदरम्यान महाराज आणि जमशेदजी ह्यांच्यामध्ये ह्याबद्दल चर्चा झाली. दोघांची घट्ट मैत्री अशीच नव्हती त्यांचे विचार देखील बऱ्यापैकी सारखेच होते. चर्चेमध्ये पुढे आले कि, टाटांचीही खूप दीवसांपासूनची अशीच इच्छा होती.

कारण, कारखानदारी देखील वाढू लागली होती आणि मोठ्या उद्योगपतींच्या वास्तवासाठी मुंबई, कलकत्ता अश्या शहरांमधे तारांकित हॉटेलची गरज आहे हा मुद्दा देखील त्यात होताच. मग महाराजांनी त्या वास्तूसाठी खर्च करण्याची जबाबदारी घेतली आणि भव्य ‘ताजमहल हॉटेल’ची निर्मिती झाली. आज दिमाखात उभे ठाकलेले ‘ताज महाल पॅलेस ‘ हॉटेल मोठाल्या उद्योगपतींना आणि अधिकाऱ्यांना तर परवडते मात्र, सर्व सामन्यांना ती चैन न परवडणारी आहे.
.
आपल्या बुद्धीला पटेल आणि जमेल इतकाच इतिहास लिहून ठेवण्याची परंपरा,मुख्य प्रसंगांना देखील सोयीच्या पद्धतीने समोर मांडते हे ह्यावरूनच लक्षात येते. ह्यामध्ये, खंत करण्याची बाब अशी कि, जमशेदची टाटा चे नाव सगळ्यांना ठाऊक आहे आणि ध्यानात आहे, मात्र ज्यांच्यामुळे ते उभे ठाकले; ज्यांनी वेळोवेळी कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या त्या मित्राला सर्वप्रकारे मदत केली त्यांचे नाव इतिहासाच्या पानात हरवून गेले आहे.

महाराजा सयाजीराव गायकवाड ह्यांनी, वेळोवेळी जमशेदची टाटा ह्यांना आर्थिक आणि भावनिक मदत केली म्हणून ‘टाटा एम्पायर ‘ उभे ठाकले हे त्रिवार सत्य आहे…

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *