“तुझ्या आईला सांग, मी एक दिवस मुख्यमंत्री होणार”, डंके की चोट वर प्रेयसीला प्रपोज करताना दिलेला शब्द जेव्हा खरा होतो…

“तुझ्या आईला सांग, मी एक दिवस मुख्यमंत्री होणार”, डंके की चोट वर प्रेयसीला प्रपोज करताना दिलेला शब्द जेव्हा खरा होतो…

आपण आपल्या आस-पास रोज किती तरी लव्ह स्टोरी बघत असतो. त्यापैकी बऱ्याच प्रेमकथा बघून, ऐकून आपण बोलतो कि ह्यावर तर एक सिनेमा बनवायला हवा. कारण अगदी तशीच त्यांची प्रेमकथा असते. त्याचप्रकारे, नुकतीच एक अगदी फिल्मी प्रेमकथा आपल्या समोर आली आहे. ही लव्हस्टोरी बघून, एखाद्या सिनेमाची कथा ऐकत आहोत का असेच तुम्हाला वाटेल..

आसाम राज्याचे नव्याने मुख्यमंत्री बनलेले, हिमंत ह्यांची प्रेमकहाणी खूपच फिल्मी आहे. कॉटन कॉलेज मध्ये शिकत असताना, हिमंत यांनी रिंकी यांना म्हटलं होतं, की तुझ्या आईला सांग, मी एक दिवस मुख्यमंत्री बनेल. ही गोष्ट त्यांनी कॉलेजमध्ये असतानाच बोलून दाखवली होती आणि आज ती वास्तवात आली. रिनिकी भुयन आता त्यांच्या पत्नी आहेत

आसामचे नवीन मुख्यमंत्री, हिमंत बिस्वा सरमा ह्यांना महाविद्यालयात असतानापासूनच खात्री होती, की ते एक दिवस आसामचे मुख्यमंत्री होतीलच. कॉटन कॉलेज मध्ये शिकत असताना, हिमंत यांनी आपल्या खास मैत्रिणीला म्हणजेच रिंकी यांना म्हटलं होतं, की ‘तुझ्या आईला सांग, मी एक दिवस मुख्यमंत्री बनेल’.
आसामचे पंधरावे मुख्यमंत्री झाल्यानंतर हिमंत यांच्या पत्नी रिंकी यांनी माध्यमांसोबत बोलत असताना सांगितलं, की हिमंत ह्यांना कॉलेजमध्ये असल्यापासूनच या गोष्टीवर ठाम विश्वास होते, की पुढे आयुष्यात त्यांना काय करायचं आहे. अभ्यासातही ते पूर्ण लक्ष देत असत. रिनिकी यांनी सांगितलं, की हिमंत त्यांना भेटले तेव्हा ते २२ वर्षाचे तर रिंकी १७ वर्षांच्या होत्या. जेव्हा रिंकीनी विचारलं, की मी माझ्या आईला काय सांगू तेव्हा हिमंत म्हणाले, की त्यांना सांग की एक दिवस मी आसामचा मुख्यमंत्री बनेल.

हे ऐकून सुरुवातील रिंकी चांगल्याच आश्चर्यचकीत झाल्या. मात्र, नंतर त्यांच्या हे लक्षात आलं, की त्या ज्या व्यक्तीसोबत लग्न करणार आहेत, त्याचं एक ठरवलेलं लक्ष्य आहे. राज्यासाठी स्वप्न आणि दृढनिश्चय आहे. रिनिकी यांनी सांगितलं, की हिमंत आमदार असताना आमचं लग्न झालं. नंतर ते मंत्री बनले. हा संपूर्ण राजकीय प्रवासच होता, मात्र जेव्हा त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा हे खरं आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता.

पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, रिनिकी यांनी सांगितलं, की एक दिवसआधी हिमंत म्हणाले, की मुख्यमंत्री पदाचा दावेदार. यावर रिनिकी यांनी कोण असा सवाल केला. यावर हिमंत यांनी मी असं उत्तर दिलं. रिनिकी म्हणाल्या, हिमंत नेहमी माझी हिंमत राहीले. मी कधीच त्यांना मुख्यमंत्रीपदासोबत जोडूनच पाहिलं नाही. त्यामुळे, यासाठी मला थोडा वेळ लागेल. हिमंत यांचं कौतुक करताना रिनिकी म्हणाल्या, की राज्यातील कोरोना स्थिती त्यांनी ज्याप्रकारे सांभाळली ते कौतुकास्पद आहे. कोरोना अजूनही संपला नसला तरी त्यांनी ही लढाई इमानदारीनं लढली आहे.

हिमंत यांची पत्नी मीडिया उद्योजक आहे आणि दोघांना दोन मुलं आहे. त्यांचं वय 19 आणि 17 वर्ष आहे. हिमंत यांनी कॉटन कॉलेजमधून आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. गर्व्हरमेंट लॉ कॉलेजमधून एलएलबी आणि गुवाहाटी युनिव्हर्सिटीमधून पॉलिटिकल साइन्समध्ये पीएचडी केली आहे.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *