बोंबला ! को’रो’ना’वर आरोग्यमंत्र्याचा विचित्र सल्ला, डार्क चॉकोलेट खाऊन

बोंबला ! को’रो’ना’वर आरोग्यमंत्र्याचा विचित्र सल्ला, डार्क चॉकोलेट खाऊन

को’रो’नाच्या विषाणूंनी जसा आपल्या देशात प्रवेश केला तसा, आपल्याकडे व्हाट्सअप आणि इतर सोशल मीडियाच्या भिंती त्याच्यासाठी असणाऱ्या घरगुती उपायांनी रंगवण्याचे काम सगळीकडे सुरु झाले. कोणी सांगते नियमित गरम पाणी प्या, तर कोणी एखाद्या काढ्याचा उपाय सांगत आहे. मात्र, ह्यासर्वांसोबत औषध आणि कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणाने पालन करणे अतिशय महत्वाचे आहे. त्याशिवाय आपण ह्या आजारावर विजय मिळवूच शकत नाही. मात्र, आता नुकतंच चक्क आपल्या देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी ह्यासाठी एक भन्नाट ऊपाय सांगितला आहे.

को’रो’ना संसर्गाच्या तणावातून मुक्त होण्यासाठी डार्क चॉकलेट खाण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिला आहे. को’रो’ना झालेल्यांनी काय काय खावे याची पूर्ण लिस्टच हर्षवर्धन ह्यांनी प्रदर्शित केली आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या ट्विटरच्या अधिकृत अकाऊंट वरुन ही माहिती दिली आहे. तुमचा को’रो’ना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास अजिबात घाबरून जाऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या. योग करा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहार घ्या. त्यामुळे को’वि’डचा सामना करण्यास मदत मिळेल, असं हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.

स्ट्रेस कमी कारण्यासाठी आधार काय?

डार्क चॉकलेटमध्ये ७० टक्के कोको कंटेन्ट असतं. त्यामुळे को’रो’नाच्या स्ट्रेसवर मात करता येते, म्हणून डार्क चॉकलेट खा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. हर्षवर्धन यांनी हा सल्ला दिल्यानंतर पुण्यात आणि भोपाळमध्ये संशोधन करणारे अनंत भान डार्क चॉकलेट खाल्ल्याने को’रो’ना’च्या स्ट्रेसवर मात करता येते याला आधार काय? असा सवाल केला आहे. डार्क चॉकलेट घेणं किती लोकांना परवडणार आहे?, असा सवालही भान यांनी केला आहे.

को’रो’ना काळात फक्त शारीरिक नाही तर मानसिक परिणामही होतो. अँझायटी, स्ट्रेस जाणवतो आहे आणि हे कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट उत्तम आहे. कमीत कमी ७० टक्के कोको पावडर असलेलं चॉकलेट खा, जेणेकरून अँझायटी कमी होईल, असे सांगण्यात येत आहे.हर्षवर्धन यांनी डार्क चॉकलेटसह अन्य पदार्थांची यादीही दिली असून त्यातून इम्युनिटी पॉवर वाढत असून स्ट्रेसही कमी होत असल्याचं म्हटलं आहे. नागरिकांनी शरीरात अधिकाधिक व्हिटॅमिन जाण्यासाठी भाजीपाला आणि फळांचं सेवन वाढवावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

को’रो’नाविरुद्ध लढण्याचा मेन्यू

मांसपेशींमध्ये इम्युनिटी आणि एनर्जी लेव्हल वाढवणाऱ्या खाद्यपदार्थांचं सेवन करा. साबूत, ओट्स आणि अमरनाथचं सेवन करण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. प्रोटीनसाठी चिकन, मासे, अंडी, पनीर, सोया आणि नट्सचं सेवन करण्याचा सल्लाही आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

डार्क चॉकलेट शिवाय आणखीन कोणते पदार्थ फायदेशीर आहेत हे देखील या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. नाचणी, जवस आणि अमर वेलचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. तर इम्युनिटी वाढवण्यासाठी हळदीचं दूध पिण्यासही सांगण्यात आलंय. शिवाय आमचूर पावडरही फायदेशीर असल्याचं सांगितलं आहे. ड्राय फ्रुट खाल्ल्यानेही इम्युनिटी वाढते. त्यामुळे बदाम, आक्रोड, मनुका खायला हव्यात. तर ऑलिव्ह ऑईल, राई तेलही चांगलं आहे. प्रोटीन शरीरात चांगल्या प्रमाणात असायला हवं. त्यासाठी अंड,मासे, पनीर, सोयाबीन यांचंही सेवन करायला हवं.

हळदीच्या दूधचे महत्व

इम्युनिटी वाढवण्यासाठी हळदीयुक्त दूध प्या, असा सल्लाही देण्यात आला आहे. हळद हि सर्वात उत्तम असुन रात्री झोपताना हळदीचे दूध पिल्याने सर्दी,पडसे, खोखला असे रोग दूर राहून रोग प्रतिकारक्षमता वाढते.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *