“भारताकडे को’रो’नाच्या संकटातुन बाहेर पडण्यासाठी आता ‘हा’ एकच पर्याय “

“भारताकडे को’रो’नाच्या संकटातुन बाहेर पडण्यासाठी आता  ‘हा’ एकच पर्याय “

माघील जवळपास दीड वर्षांपासून, संपूर्ण जग को’रो’नासोबत झगडत आहेत. को’रो’नाच्या महामारीने संपूर्ण जगाला त्रासिले आहे. त्यात को’रो’ना’च्या पहिल्या लाटेमधे बऱ्याच देशांनी भीषण आणि गंभीर परिस्थितीचा सामना केला आहे. त्यानंतर, को’रो’ना’च्या महामारीमधून सावरल्या नंतर ह्या देशांनी येणाऱ्या पुढल्या लाटेसाठी म्हणजेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी स्वतःला तैयार केले. मात्र, काही देशांना ते जमले नाही आणि आता त्या देशांना को’रो’ना’च्या दुसऱ्या लाटेने आपले भयानक रूप दाखवले आहे. त्यामध्ये, आपल्या देशाचे म्हणजेच भारत देशाचे नाव देखील आहे.

आपल्या देशाची, को’रो’ना’ची परिस्थिती अतिशय गंभीर स्वरूपाची झाली असून आता पूर्णपणे हाताच्या बाहेर गेली आहे. दिवसेंदिवस को’रो’ना रुग्णांची संख्या वाढतच आहे आणि त्यात त्यांच्या मृत्यूची संख्या देखील वाढतच आहे. त्यामुळे अतिशय भयंकर परिस्थती मध्ये सध्या आपला देश सापडला आहे. मृत्यूने सगळीकडे हाहाकार मांडला आहे.

को’रो’नाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय नेतृत्वावर कडाडून टीका होताना दिसत आहे. भारत मोठा लस उत्पादक देश असताना देखील लसीकरणावर ज्याप्रमाणात भर द्यायला पाहिजे होता, तेवढा भर दिला गेला नाही, असा आरोप करण्यात येत आहे. त्यातच आता अमेरिकन सरकारचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डाॅ. अँथनी फाउची यांनी भारताला एक महत्वाचा सल्ला दिला आहे.

को’रो’नाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. भारताला को’रो’नाच्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी लसीकरण हा एकच पर्याय असल्याचं अमेरिकेचे संसर्ग रोग तज्ज्ञ डाॅ. अँथनी फाउची यांनी म्हटलं आहे. डॉ.अँथनी हे अमेरिकन सरकारचे मुख्य वैद्यकीय सल्लागार देखील आहेत. भारतातील रुग्णालयात ऑक्सिजन, पीपीई किटस आणि अन्य वैद्यकीय सामग्री, उपकरणांचा तुटवडा असून अमेरिकेनं मदतीसाठी पुढे यायला हवं, असंही अँथनी फाउची यांनी म्हटलं आहे.

रुग्णालयात खाटा उपलब्ध नसल्यामुळं रुग्णांना वाऱ्यावर सोडून देणे अगदी अयोग्य आहे. भारतात ऑक्सिजन मिळणंही कठीण झालं आहे. को’रो’ना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनची आवश्यकता असल्याचं डाॅ. अँथनी फाउची यांनी म्हटलं आहे. भारत जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे. त्यांना फक्त देशातूनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील संसाधनं उपलब्ध होत आहेत, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, को’रो’नाचा कहर शमण्यासाठी सात वर्षे लागू शकतात, असा दावा डॉ. अँथनी फाउची यांनी केला होता. तसेच जगभरातील ७५ टक्के नागरिकांची हार्ड इम्यूनिटी समान पातळीवर येण्यासाठी बराच मोठा कालावधी जाईल, असं अँथनी फाउची यांनी म्हटलं होतं.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *