‘या’ गावात राहतात, कौरव-पांडवांचे वंशज, अतिशय अद्भुत आहे परिसर, एकदा जाऊन पाहाच…

‘या’ गावात राहतात, कौरव-पांडवांचे वंशज, अतिशय अद्भुत आहे परिसर, एकदा जाऊन पाहाच…

13 जून 2013 रोजी आपण ज्याला देव भूमी समजतो, अशा उत्तराखंडमध्ये महाप्रलय आला होता. त्यावेळी हा महापुर एवढा मोठा होता की, यामध्ये हजारो लोकांचा जीव गेला होता. या प्रलयात अनेक लोकांचे मृतदेह देखील सापडले नाहीत. त्यामुळे अनेक मुलांना त्यांच्या आई-वडिलांना देखील पाहता आले नाही. तर अनेकांना इतरांना पाहता आले नाही, असे असले तरी एवढा प्रलय होउनही तेथे असलेले केदारनाथ मंदिर हे जशाल तसे राहिले.

याच्या भिंतींना अजिबात तडा गेला नाही. या भिंतीवर खूप मोठे पाणी आले. माती पसरली. मात्र, या मंदिराला अजिबात धोका पोहोचला नाही. कारण या मंदिराचे बांधकाम हे अतिशय चांगले असे आहे. त्यामुळे याला काहीही धोका पोहोचला नाही. मात्र, या प्रल्यामध्ये खूप मोठे नुकसान झाले होते. मृतदेह काढण्‍यासाठी मिल्ट्री, आर्मीची मदत घेण्यात आली होती. असे असले तरी हा परिसर आता पुन्हा एकदा सावरू लागला आहे. काही दिवसांपूर्वी येथे पुन्हा एकदा पूर आला होता.

देवभूमी मध्ये पहाडी भाग खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथे नेहमीच पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडत असतो. त्यामुळे येथे पर्यटन करण्यास काही काळासाठी मज्जाव देखील करण्यात येतो. असे असले तरी पर्यटक या ठिकाणी जाण्यास अजिबात घाबरत नाहीत. उत्तराखंडचा प्रत्येक जिल्हा हा अतिशय सुंदर असा आहे. आपण महाभारतामध्ये कौरव-पांडव याचा इतिहास हा ऐकला असेल पाहिला असेल.

यंदाच्या कोरोना महामारी मध्ये पुन्हा एकदा दूरदर्शन वर महाभारत रामायण या मालिका दाखवण्यात आलेल्या आहेत. यामध्ये कौरव-पांडव यांचा इतिहास महाभारतात दाखवण्यात आला.आजच्या पिढीला कौरव-पांडव इतिहास हा जास्त प्रमाणात माहीत नाही. त्यामुळे त्यांना याबाबत माहिती करून घ्यावी लागते.

आजची पिढी महाभारताचा इतिहास ही वाचणारी नाही. त्यामुळे त्यांना टीव्ही मालिकांमधून किंवा इतरत्र याबाबत माहिती द्यावी लागते.आज आम्ही आपल्याला कौरव-पांडवांच्या गावाबद्दल माहिती देणार आहोत. असे सांगण्यात येते की, उत्तराखंडमध्ये त्यांचे एक गाव होते. या गावामध्ये आजही कौरव पांडवांचा उत्सव साजरा करण्यात येतो.

उत्तराखंडच्या गडवाल क्षेत्रामध्ये हे गाव आहे. या गावाचे नाव कलाप, असे आहे. कलाप हे गाव डोंगर दऱ्यांमध्ये वसलेले असून या गावाची लोकसंख्या ही अतिशय कमी आहे. वस्ती कमी असल्यामुळे येथे पर्यटक देखील जास्त येत नाहीत. त्याचप्रमाणे येथील वस्ती ही विरळ आहे. या गावाला खूप पौराणिक कथा चा आधार आहे. महाभारताचा आधार या गावाला असल्याचे अनेक जण सांगत असतात.

कौरव-पांडवाचे येथे वास्तव्य होते आणि त्यांचे वंशज देखील येथे राहतात, असेही सांगण्यात येते. या गावांमध्ये बकऱ्या चालणारे लोक जास्त प्रमाणात राहतात. तसेच या गावामध्ये कर्णाचे मोठे मंदिर असून करण्याचा उत्सव देखील येथे साजरा करण्यात येतो. विशेष म्हणजे हा उत्सव दर दहा वर्षानंतर करण्यात येतो.

त्यामुळे हा उत्सव अतिशय जोमाने साजरा होत असतो. त्याचप्रमाणे पांडव नृत्य देखील येथे दरवर्षी जानेवारी महिन्यात करण्यात येते, असेही सांगण्यात येते. या गावाला जाण्यासाठी आपल्याला वर्षभरात कधीही जाता येईल. दिल्लीपासून हे गाव 540 किलोमीटर अंतरावर आहे, तर देहरादूनपासून हे गाव केवळ दोनशे दहा किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे आपण येथे चांगली ट्रीप आयोजित करू शकता.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *