ररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन

जर तुमचा पगार 15 हजार रुपयांहून कमी आहे आणि आतापर्यंत निवृत्तीनंतरचा (Retirement Planning) काही प्लान नाही तरी चिंता करू नका, मोदी सरकारच्या PM Shram Yogi Mandhan Yojana पेंशन स्कीमची तुम्हाला मदत होऊ शकते. यामध्ये 60 वर्षांनंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये आणि वर्षाला 36 हजार रुपये पेंशन मिळू शकते. या स्कीमअंतर्गत 18 ते 40 वर्षांमधील कोणताही व्यक्ती सहभागी होऊ शकतो. अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही आपलं खातं सुरू करू शकता व यासाठी फार कागदपत्रांची गरज भासत नाही. रोजगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या स्कीमच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल 45 लाख लोक जोडले गेले आहेत.

या स्कीमअंतर्गत 18 वर्षीय व्यक्तीही सहभागी होऊ शकतो. जर कोणी कर्मचारी 18 वर्षांचा आहे तर त्याला पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत 60 वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला 55 रुपये जमा करावे लागतील. एक दिवसाचा हिशोब केला तर तब्बल ही रक्कम 2 रुपये इतकी असेल. जर कोणी 29 वर्षांचा आहे तर त्याला पेंशन मिळविण्यासाठी 60 वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला 100 रुपये जमा करावे लागतील. जर कोणी कर्मचारी 40 वर्षांचा असताना या योजनेत सहभागी होतो तर त्याला प्रत्येक महिन्याला 200 रुपयांचं योगदान द्यावं लागेल. जितकं योगदान खातेदाराचे असेल सरकारकडूनही तितकीचे योगदान दिले जाईल.

योजनेचे नियम

पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना असंघटिक क्षेत्रातील कामगारांसाठी आहे. ज्यामध्ये वेठविगार मजुंरासह घरकामगार, ड्रायव्हर, इलेक्ट्रिशन आणि स्वीपर अशा प्रकारच्या सर्व कामागारांना फायदा मिळेल. पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना असंघटिक क्षेत्रातील कामगारांसाठी आहे. ज्यांचा महिन्याचा पगार 15000 हून जास्त असू नये. या योजनेत सहभागी होण्यासाठी वय 18 ते 40 यादरम्यान असायला हवे.

कसे कराल रजिस्ट्रेशन

-यासाठी तुमच्याजवळ आधार कार्ड आणि बचत खाते/जनधन खाते (IPSC कोडसह) असणं आवश्यक आहे. सोबतच तुमचा मोबाइल क्रमांकही आवश्यक आहे.

-पंतप्रधान श्रमयोगी मानधन पेंशन योजनेत रजिस्ट्रेशन पाससाठी सीएससी सेंटरवर जावे लागेल.

-यानंतर तेथे आधार कार्ड आणि बचत खाते वा जनधन खाते जे असेल त्याची माहिती आयएफएससी कोडसह द्यावी लागेल. पुरावा म्हणून पासबुक, चेकबुक वा बँक स्टेटमेंट दाखवू शकता.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *