राखीने पती गुलजार यांची फक्त एक अट मान्य केली नाही म्हणून एका वर्षाच्या आतच तुटले लग्न, पुढे आयुष्यभर राहिल्या एकट्या….

राखीने पती गुलजार यांची फक्त एक अट मान्य केली नाही म्हणून एका वर्षाच्या आतच तुटले लग्न, पुढे आयुष्यभर राहिल्या एकट्या….

हिंदी चित्रपटसृष्टी म्हणजेच बॉलिवूड मध्ये, रोज अनेक नवीन नाते जुळतात आणि मोडतात देखील.. त्यामधील काही नाते, बरीच वर्ष टिकतात, काही नाते आयुष्यभराची साथ देतात तर काही नाते काही दिवसांमध्येच संपुष्टात येतात. मैत्रीची नाते खरे बघता बरीच वर्ष टिकतात, मात्र प्रेमबंधन आयुष्यभर टिकतातच असे नाही.

बॉलिवूडमधील अनेक लग्न टिकली नाहीत. त्या लग्नाचा शेवट सेपरेशनने झाला. बऱ्याच वेळा लग्न तुटण्याची काही शुल्लक करणे असतात तर कधी कधी त्याचे मोठे कारण देखील असते. बऱ्याच वेळा कितीही मोठे कारण असले तरीही नाते टिकून देखील राहते, आणि कधी ते टिकतही नाही..

राखी आणि गुलजार यांचं लग्नही काहीसं असंच होतं. या दोघांचं लग्न केवळ एक वर्ष टिकलं आणि मग त्यांनी त्यांचे मार्ग कायमसाठी वेगळे केले. राखी आणि गुलजार यांचं १५ मे १९७३ रोजी लग्न झालं. आणि यानंतर डिसेंबर १९७३ रोजी मुलगी मेघनाचा जन्म झाला. मुलीच्या जन्मानंतर या दोघांच्याही आयुष्यात भांडणाला सुरुवात झाली.

मीडिया रिपोर्टनुसार, राखी यांनी चित्रपटात काम करणं थांबवावं अशी गुलजार यांची इच्छा होती, तर राखी यांना तसं करण्याची इच्छा नव्हती. राखी यांनी गुलजार यांना आपला निर्णय बदलण्यासाठी मनापासून समाजावलं होतं. या प्रकरणामुळे राखी यांनी बर्‍याच चांगल्या पटकथा नाकारल्या. गुलजार या सगळ्याला सहमत नव्हते आणि म्हणूनच यानंतर राखी त्यांच्यापासून विभक्त झाल्या.

लग्न मोडल्यानंतर राखी स्वतंत्रपणाने राहू लागल्या. एका मुलाखतीत त्या म्हणाल्या, ‘स्वतंत्रपणात एकटं राहणं ही माझी निवड होती. माझ्या कुटुंबात १९ लोक असूनही मी स्वत: ला घरात आयसोलेट करायचे. किट्टी पार्टी वैगरे मला टाईम वेस्ट वाटायचा. त्याऐवजी मी व्ही शांताराम, सोहराब मोदी, मेहबूब खान आणि के. आसिफ यांचे मॉर्निंग शो पहायला जायचे. जेव्हा मला मुंबईतल्या गर्दीची कंटाळा यायचा तेव्हा मी पनवेलमधील माझ्या फार्महाऊसवर जायचे’.

भलेही राखी आणि गुलजार दोघेही आता वेगळे झाले असले तरी देखील आजही त्या दोघांमध्ये चांगली बॉन्डिंग आहे. त्या दोघांनी आपल्या मुलीला आई-वडील दोघांचेही प्रेम भेटावे असे नेहमीच प्रयत्न केले. गुलजार यांनी एका मुलाखतीत सांगितले की, आताही जेव्हा मला राखी यांच्या हाताने बनवलेली फिश करी खायची ईच्छा होते. तेव्हा मी तिला गिफ्ट म्हणून साडी देतो, जसं की आम्ही जेव्हा एकत्र राहायचो, तेव्हा देखील मी त्यांना असंच गिफ्ट द्यायचो.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *