अमूल कंपनीत वडील ड्रायव्हर, मुलासमोर त्याच कंपनीच्या प्रमुखाचा आदर्श, आता कमावतोय लाखो रुपये

अमूल कंपनीत वडील ड्रायव्हर, मुलासमोर त्याच कंपनीच्या प्रमुखाचा आदर्श, आता कमावतोय लाखो रुपये

स्वप्न पाहणे आणि ती प्रत्यक्षात उतरवणे हे सर्वांना शक्य होत नाही. अनेक जण स्वप्न पाहत असतात. मात्र, ते प्रत्यक्षात उतरवत नाहीत. मात्र, काही जण असे असतात की, ते स्वप्न पाहतात आणि प्रत्यक्षात उतर वतात देखिल. भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे की मोठे स्वप्न पहा आणि ते सत्यात आणा.

आपल्या भारतामध्ये अशी काही उदाहरणे आहेत की, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. मात्र, फारच कमी लोकांना असे यश मिळत असते. एखादी गोष्ट करायची म्हणजे त्यामध्ये सातत्य हवे असते. जर आपण सातत्यपूर्ण एखादी गोष्ट जर केली तर त्यामध्ये यश निश्चित मिळते. मात्र, अनेक लोक असे असतात की, अर्धवट काम करून ते सोडून देतात आणि नशिबाला ओरडत असतात. मात्र, ज्यांना खरोखरच काहीतरी करून दाखवायचे आहे, असे तरुण हे स्वप्न पाहून प्रत्यक्षात उतरवत असतात.

आज आम्ही आपल्याला 24 वर्षाच्या तरुणा बाबत अशीच माहिती देणार आहोत. या 24 वर्षाच्या मुलाचे नाव हितेश सिंह असे आहे. त्याचे वडील अमुल या प्रसिद्ध कंपनीमध्ये ड्रायव्हर होते. हितेश हा नेहमी स्वप्न पाहयाचा की आपल्याला या कंपनीच्या मालकासारखे मोठे बनायचे आहे. त्याने ते स्वप्न पूर्ण देखील करून दाखवले. मोठे कष्ट करून हितेश याने आय एम आय संस्थेत अहमदाबाद येथे शिक्षण घेतल्यानंतर 24 वर्षीय हितेशला असोसिएट मॅनेजर पदावर कंट्री डिलाईटने नोकरीची ऑफर मिळाली.

सुरुवातीपासूनच हितेशला दुग्ध व्यवसायात मोठा रस होता. त्यामुळे त्याने नोकरी सोडून दिली. त्यानंतर त्याची गुजरात दूध उत्पादन संघाचे अध्यक्ष आर एस सोधी यांना भेटण्याची इच्छा होती. त्यानुसार त्याची इच्छा देखील पूर्ण झाली. सोधी यांनी देशाला दूध उत्पादन क्षेत्रात करिअर करण्यासाठी खूप मार्गदर्शन केले. त्यानंतर त्याने या क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवले. काही दिवसांपूर्वी हितेशने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तो म्हणाला की, भारतामध्ये दूध क्षेत्रामध्ये बरेच काही करून दाखवण्याची खूप मोठी संधी आहे.

या क्षेत्रामध्ये सध्या संघटित क्षेत्रातील एकूण मागणी पेक्षा 25 टक्के नुकसान भरपाई दिली जाते. त्यामुळे या क्षेत्रात अजूनही खूप मोठी संधी आहे. गेल्या चार-पाच वर्षांमध्ये या क्षेत्रामध्ये अनेक जण आलेले आहेत. अनेकांनी स्टार्टअप सुद्धा नाविन्यपूर्ण उत्पादन घेऊन केले आहे. त्याला हितेश देखील मार्गदर्शन करत असतो. हितेश याचे बालपण अत्यंत गरिबीत गेले होते. त्याला शिक्षणासाठी कुठलीही शिकवली नव्हती तसेच शिष्यवृत्ती देखील मिळाली नव्हती. साध्या शाळेमधून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले होते.

बारावी मध्ये त्याला 97 टक्के गुण मिळाले होते. यासाठी त्याची आई सरिता बेन यांनी त्याला शिकवले होते. त्यामुळे आपल्या यशाचं श्रेय तो आपल्या आई-वडिलांना देतो. 12 वीनंतर त्याने एसएमसी कॉलेज ऑफ डेअरी सायन्स, आनंद कृषी विद्यापीठ, गुजरात येथून दुग्ध तंत्रज्ञानात बीटेक केले. कॉमन अ‍ॅडमिशन टेस्टमध्ये (कॅट) त्याने 96.12 टक्के गुण मिळविले. हितेश याचे वडील पंकज सिंह हे बिहारमधून नोकरीच्या शोधात गुजरात येथे आले होते. त्यानंतर त्यांना सुरुवातीला सिक्युरिटी गार्ड म्हणून अमुल कंपनीत नोकरी मिळाली होती.

त्या वेळी त्यांना केवळ सहाशे रुपये पगार होती. त्यानंतर त्यांना ड्रायव्हरची नोकरी मिळाली आणि त्यांचे जीवनमान बदलून गेले. त्यानंतर हितेश याची सोधी यांच्यासोबत ओळख झाली. सोधी यांनी त्याला वेळोवेळी मार्गदर्शन केले. दरम्यान, हितेश आज गुजरात मधील एका दूध उत्पादक कंपनीचा मालक असून तो कोट्यवधी रुपये कमवत असल्याचे सांगण्यात येते. तसेच त्याच्या कंपनीमध्ये अनेक कामगार देखील आहेत.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *