वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहावी, ह्यासाठी अगदी सोपे उपाय, कधीच कमी पडणार नाही धन…

वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहावी, ह्यासाठी अगदी सोपे उपाय, कधीच कमी पडणार नाही धन…

वास्तुशास्त्र हे खूप मोठे आणि महत्वाचे शास्त्र आहे. आपल्या घरात कोणती वस्तू कुठे आहे किंवा कोणती खोली कुठे आहे ह्यावर बरच काही अवलंबून असते. जसे की, आपले स्वयंपाकघर आग्नेय बाजूलाच असायला हवे, जर आग्नेय भागात स्वयंपाकघर घर नसून पाण्याची टाकी किंवा इतर काही असेल तर त्या घरात सतत वाद निर्माण होत राहतात. त्याचप्रकारे आपल्या हिंदू धर्मात वास्तुशास्त्र मध्ये खूपच सोपे असे काही उपाय आहेत, ज्यामुळे आपल्या घरात सदैव लक्ष्मीची कृपा राहील. आपल्या घरात कधीच धन-संपत्तीची कमतरता जाणवणार नाही. तर जाणून घ्या काय आहेत ते सोपे उपाय…

घराचा दरवाजा

आपल्या घराचा दरवाजा हा लाल किंवा मरून रंगाचा असणे आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी शुभ असे समजले गेले आहे. म्हणून नेहमीच वास्तुशास्त्रज्ञ आपल्याला घराचा दरवाजा लाल किंवा मरुन रंगाचा असावा असा सल्ला देतात.
लाल आणि मरून हे दोन्ही रंग माता लक्ष्मीचे अगदी आवडते आहेत. अगदी आपल्या सारख्या सर्व-सामान्य व्यक्तींसारखेच देवही स्वतःच्या आवडीच्या वस्तू कडे सगळ्यात पहिले आकर्षित होतात, म्हणून त्या रंगाकडे लक्ष्मी देवीचेही सगळ्यात पहिले लक्ष जाते. तुमचा दरवाजा जर ह्या रंगांचा नसेल तर तुम्ही त्या रंगाची एखादी आकर्षित डिजाईन किंवा फुले, स्वस्तिक असेही काढू शकतात.

स्वस्तिक, ॐ किंवा श्री असे लिहलेले किंवा त्याचे चिन्ह जर आपण आपल्या घरातील मुख्य दरवाजाला लावले तर घरामध्ये नाकारत्मक ऊर्जा कमी प्रमाणात येते.

आपल्या घराचे दार खूपच महत्वाचे असते. सकरात्मक असेल किंवा नकारत्मक ऊर्जा असेल दोन्हीही बाबी ह्याच दरवाजा मधून आपल्या घरात प्रवेश करतात. त्यामुळे आपल्या घराचे मुख्यद्वार हे अगदी महत्वाचे ठरते. रोज जेव्हा आपण आपल्या घराचा हा दरवाजा उघडतो, तेव्हा सर्वात प्रथम माता लक्ष्मीचे स्मरण करायला हवे. माता लक्ष्मीचे अनेक मंत्र आहेत, मात्र ह्या मंत्रांचे उच्चारण करायलाच हवे असे नाही.
‘हे माता, तू सतत आपली कृपा माझ्या ह्या घरावर ठेवली आहे. त्याबद्दल धन्यवाद आणि इथून पुढे अशीच तुझी कृपा ह्या घरावर आणि कुटुंबातील व्यक्तींवर राहू दे. सतत आनंदाने ह्या घरात वास कर,’ केवळ इतकेच बोलत माता लक्ष्मी चे स्मरण करत आपल्या घराचा मुख्य दरवाजा सकाळी उघडावा. ह्यामुळे घरामध्ये सकारत्मक ऊर्जेचे प्रवेश होतो, आणि अश्या जागी लक्ष्मी मातेला वास करायला आवडते. अगदी समृद्ध असे ते घर बनते, आणि तसेच समृद्ध राहते.

गुलाबाचे अत्तर

गुलाब, कमळ, सोनचाफा इ सर्व लक्ष्मी मातेचे आवडते फुले आहेत. आपल्या ग्रंथांमध्ये लिहले आहे की, गुलाब फुलापासून बनलेले अत्तर हे विष्णू व विष्णुप्रिया म्हणजेच लक्ष्मी मातेचे आवडीचे आहे. ह्याचा सुगंध आपल्या हिंदू धर्मातील सर्वच देवींसाठी अतिप्रिय असा आहे. रोज सकाळी उठल्यानंतर, जल देखील ग्रहण करण्यापूर्वी गुलाबाचे अत्तर माता दुर्गेला अर्पण करावे आणि त्यानंतर आपल्या बेंबीवर लावा. आपल्या दिनचर्येमध्ये ह्याचा समावेश करावा, त्यामुळे तुम्हाला कधीच आर्थिक अडचणी येणार नाही. धन, संपत्ती आणि समृद्धी सदैव तुमच्या घरी वास करत राहील.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *