वेषांतर केलेल्या कृष्ण प्रकाश ह्यांना ‘खाकी’चा एक असाही अनुभव, पोलिसांनीच..

वेषांतर केलेल्या कृष्ण प्रकाश ह्यांना ‘खाकी’चा एक असाही अनुभव, पोलिसांनीच..

पिंपरी चिंचवड येथील पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेषांतर करून पोलिस ठाण्यांचा आढावा घेतला असता, पोलिस ठाण्यात सर्वसामान्य नागरिकांना येणारा कटू अनुभव पोलिस आयुक्तांना देखील अनुभवण्यास मिळाला. मात्र, वाकड व हिंजवडी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनाही चांगले सहकार्य केल्याचेही दिसून आले.

मध्यरात्री एक मुस्लिम दाम्पत्य तक्रार देण्याकरिता आले तेव्हा, पोलिस कर्मचारी नेहमीप्रमाणे ठाण्यात बसले होते. पोलिसाने तेव्हा तक्रार घेण्यास टाळाटाळ केली आणि उडवाउडवीची उत्तरे दिले, मात्र काही वेळातच संबंधित पोलिस कर्मचाऱ्याची चांगलीच भंबेरी उडाली. कारणदेखील तसेच होते खुद्द पोलिस आयुक्तच तक्रारदार म्हणून पोलिस कर्मचाऱ्यापुढे उभे ठाकले होते.

बुधवारी रात्री,पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर करून आयुक्तालयाच्या हद्दी मधील विविध पोलिस ठाण्यांची पाहणी केली. ते जमालखान पठाण बनले होते. दाढी चिकटवून, डोक्यावर लालसर रंगाचा केसांचा विग चढवला होता. तसेच सलवार, कुर्ता व तोंडावर मास्क देखील होता. तर मियाची बिवी म्हणून सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे, ह्यांनी देखील वेशांतर केले व त्या त्यांच्यासोबत होत्या. हे मुस्लिम दाम्पत्य खासगी टॅक्सी करून रात्री सव्वा बाराच्या सुमारास पिंपरी पोलिस ठाण्यात आले

आम्ही पिंपरीतील म्हाडा प्रकल्पात राहत आहोत आणि, आमच्या शेजारच्या महिलेला रुग्णवाहिका पाहिजे होती म्हणून फोन केला तर आठ हजार रुपये सांगितले. पैसे खूप मागत आहेत आणि यायलाही तयार नाहीत, महिलेची प्रकृती नाजूक आहे, रुग्णवाहिका चालक अधिकचे पैसे घेऊन आर्थिक लूट करत आहेत, यावर आता तुम्हीच काहीतरी करा आणि त्याबद्दलची तक्रार दाखल करून घ्या’ अशी तक्रार घेऊन ते आले.

मात्र, सामान्य नागरिकांना जसा अनुभव येतो अगदी तोच अनुभव खुद्द पोलिस आयुक्तांना देखील आला. “तुम्ही संत तुकारामनगर चौकीत जावा, तेथे काय सांगायचे ते सांगा” असे उत्तर मिळाले. त्यावर इतक्या रात्री कुठे फिरणार येथेच तक्रार दाखल करून घ्या, अशी विनवणी करूनही तक्रार दाखल करून घेतली नाही. दरम्यान, काही वेळाने पोलिस आयुक्तांनी मास्क काढल्यानंतर ते पोलिस आयुक्त असल्याचे समोर आले. हे समजताच संबंधित पोलिसाला अक्षरशः घाम फुटला.

त्यानंतर हे दाम्पत्य रात्री दीडच्या सुमारास हिंजवडी पोलिस स्टेशन आणि नंतर दोन वाजता वाकडच्या पोलीस ठाण्यात गेली. त्या ठिकाणी “आमच्या परिसरात काही लोक रोज फटाके वाजवतात, त्याचा त्रास होतो, काही लोकांना बोललो तर त्यांनी माझ्या बायकोची छेड काढली, मला मारहाण केली”, अशी तक्रार हिंजवडी पोलिसांना दिली. त्यावेळी ड्युटीवरील पोलिसाने सर्व प्रकऱणाची माहिती घेत कच्ची फिर्याद देखील तयार केली. आपण वरिष्ठांना बोलावतो, तोपर्यंत थांबण्याची विनंती देखील केली. दरम्यान, काही वेळाने पोलिस आयुक्तांनी आपली ओळख दाखविल्यावर संबंधित कर्मचाऱ्याला काय करावे काहीच सुचेना.

कृष्ण प्रकाश म्हणाले, ड्युटीवरील कर्मचारी स्टाफ खरोखर कसे काम करतात, सामान्य नागरिकांशी कसे वागतात, ह्याकरिता अशाप्रकारे वेषांतर करून अचानक भेट दिली. पिंपरीत वाईट अनुभव होता. मात्र, वाकड व हिंजवडीत चांगला अनुभव आला. यापुढेही अशाप्रकारे अचानक भेट देणार आहे

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *