शरीरातील झिंकचे प्रमाण संतुलित असेल तर कोरोनावर कराल सहजपणे मात

शरीरातील झिंकचे प्रमाण संतुलित असेल तर कोरोनावर कराल सहजपणे मात

सध्या आपल्या शरीराची काळजी घेणे हे अतिशय महत्वाचे असे झाले आहे. त्यामुळे सगळीकडे सध्या पौष्टिक पदार्थ खाण्यात येत आहेत, जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. असे पौष्टिक पदार्थ ज्यामुळे आपल्याला रोगांपासून लढण्याची आणि त्याच्यापासून दूर राहण्याची शक्ती मिळते, असे पदार्थ खाण्यावर सध्या सर्वांचा कल आहे.

कोरोना सारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर, उत्तम आणि योग्य आःर असणे हे अतिशय महत्वाचे ठरत आहेत. ज्यांच्या शरीरात सर्व घटक संतुलित आहेत, त्यांना ह्या आजारासोबत लढण्यासाठीची म्हणजेच प्रतिकारक्षमता चांगली असणाऱ्यांची प्रकृती चांगली राहून ते लवकर बरे होत आहेत.
व्हिटॅमिन सी ने भरपूर असलेले पदार्थ खाल्ले जावेत असे सगळीकडे सांगितले जाते.

मात्र त्याचबरोबर प्रोटिन्स, झिंक, आयर्न इ घटक देखील तेवढेच महत्वाचे आहेत. त्यामुळे देखील आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढते. ह्या घटकांपैकी एक घटक आहे ‘झिंक’

आपल्या शरीरातील सूक्ष्म पोषक तत्वांपैकी एक तत्व म्हणजे झिंक आहे. मात्र, जगभरात ह्याच घटकाची बऱ्याच व्यक्तींमध्ये खास करून, लहान मुलं, वृद्ध ह्यांच्यामध्ये ह्याचे प्रमाण कमी असलेले बघायला मिळते. काही प्रचलित स्वास्थ्य संस्थानांच्या हिशोबाने, पुरुषांनी ११ मिलीग्रॅम तर महिलांनी ८ मिलीग्रॅम झिंकचे सेवन रोज करायला हवे.
गरोदर महिलांनी दररोज ११ मिलीग्रॅम झिंकचे सेवन करायला हवे.

आहार विशेतज्ञ सांगतात की, मांसाहार करत असलेल्या व्यक्तींच्या शरीरामध्ये झिंक चे प्रमाण शक्यतो कमी होत नाही. मात्र शाकाहार करत असणाऱ्यांमध्ये त्याचे प्रमाण कमी असल्याचे आढळून येते.

चिकन आणि रेड मीट ह्यामध्ये अनेक पोषक तत्वे आहेत. त्यापैकी झिंक चे अगदी महत्वाचा आणि मोठा स्रोत म्हणून चिकन आणि रेड मीट ओळखले जातात. शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आणि शक्ती प्रदान करणारे व्हिटॅमिन बी १२ देखील ह्यामध्ये उत्तम प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे चिकन आणि रेड मीटचे सेवन योग्य प्रमाणात करणे अगदी फायद्याचे ठरेल. मात्र, ह्यांच्या जास्त सेवनाने कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते त्यामुळे,त्यांचे सेवन प्रमाणात करणेच योग्य ठरते. साधारण १०० ग्रॅम मटण मध्ये ४.८ मिलीग्रॅम तर १०० ग्रॅम चिकन मध्ये ३ मिलीग्रॅम इतके झिंक उपलब्ध असते.

काजू खाल्ल्याने ऍसिडिटी वाढते, म्हणून आपल्यापैकी बरेच जण ते खाण्याचे टाळतो. मात्र काजू मध्ये उत्तम प्रमाणात झिंक उपलब्ध असते. शिवाय, शाकाहारी लोकांसाठी झिंकचे प्रमाण वाढवण्यासाठी पर्याय अगदी निवडक आहेत, त्यामुळे योग्य प्रमाणात काजूचे सेवन करणे योग्यच आहे. ह्याचबरोबर, काजूंमध्ये कॉपर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए हे घटक असतात त्यामुळे योग्य प्रमाणात काजूचे सेवन करायला हरकत नाही.

भोपळ्याच्या बियांमध्ये देखील झिंकचे प्रमाण असते. त्याचबरोबर आयरन, फोलेट, कॉपर इ घटक देखील भोपळ्याच्या बियांमध्ये असतात. सोबतच कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ह्या बिया मदतगार ठरतात.

डार्क चॉकलेट खाणे आपल्या हृदयासाठी आणि त्याचबरोबर आपले बीपी संतुलित राहते. त्याचबरोबर डार्क चॉकलेटमध्ये झिंक देखील भरपूर प्रमाणात असते त्यामुळे, डार्क चॉकोलेट चे सेवन करू देखील तुम्ही आपल्या शरीरातील झिंकचे प्रमाण वाढवू शकता.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *