हाच ठरला राजनीतीचा खरा चाणक्य, बीजेपीच्या विरोधात ममता दीदीला एक हाती विजय दिला मिळवून…

हाच ठरला राजनीतीचा खरा चाणक्य, बीजेपीच्या विरोधात ममता दीदीला एक हाती विजय दिला मिळवून…

प्रशांत किशोर हे नाव सध्या बहुचर्चित आहे. बंगालच्या निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी ह्यांना समर्थपणे साथ देऊन विजय मिळवून देणारे प्रशांत ह्यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे आणि सगळीकडेच खळबळ उडाली आहे.

एक उत्तम राजनैतिक अनॅलिस्ट आणि तज्ञ म्हणून संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळातील ‘प्रशांत किशोर’ हे मोठे नाव आहे. त्यांचे तर्क, त्यांची आकडेमोडी आणि त्याचबरोबर त्यांचा अभ्यास ह्या जोरावर कोणत्याही पक्षाला जिंकून देण्याची किमया ह्या जादूगाराकडे आहे.

भाजपा, शिवसेना आणि जनता दल ह्यांच्या साठी काम करत त्यांनी बऱ्याच वेळा अशक्य शक्य करुन दाखवत आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. आपले महत्व ते खूप उत्तम प्रकारे ओळखतात. मात्र, निवडणुकांचा निकाल आल्यानंतर त्यांनी केलेलं ट्विट आणि त्यांनी एका टेलिव्हिजन ला दिलेल्या मुलाखतीनुसार ते आता राजनीती मधून म्हणजेच त्यांच्या ह्या कामातून संन्यास घेण्याच्या विचारात आहेत. त्यांच्या ह्या वक्तव्यामुळे भल्या-भल्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

‘खूप केलं आता. आता बस झालं. मला आता ब्रेक हवा आहे. मला आता वेगळं काही करायचं आहे, त्यासाठी मी विचार करत आहे,’ असे प्रशांत ह्यांनी एनडीटीव्ही इंडिया ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलले आहे. एक कर्तबगार रणनीतीकर, राजकारणाचा आणि जनतेचा अचूक अंदाज घेत मोठाल्या पक्षांना आणि नेत्यांना निवडणुका लढण्यासाठी जिंकण्याची गणित आखणारे आणि आडाखे उभारणारे प्रशांत ह्यांना बंगालच्या विजयाचे काही श्रेय नक्कीच देण्यात येत आहे.

बंगालच्या ह्या निवडणुकांमध्ये, ममता बॅनर्जी ह्यांच्यासाठी, प्रशांत ह्यांनी रणनीती आखली होती. त्यांच्या अचूक अश्या अभ्यासानुसार, ममता बॅनर्जी ह्याच मोठ्या विजयाच्या जवळ आहेत असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्याचबरोबर, भाजपाने १०० चा आकडा पार केला तर मी माझी जागा सोडून देईल असेही त्यांनी निर्भीडपणे बोलले होते.

प्रशांत ह्यांच्या वक्तव्यानुसार, आज निकालांमध्ये अगदी तसेच दिसून येत आहे. तृणमूल काँग्रेसने मोठा असा विजय नोंदवला असून दुसरीकडे भाजपा १०० च्या जवळ पोहचण्यासाठी देखील संघर्ष करत आहे. आता प्रशांत ह्यांनी हे काम सोडण्याचा विचार करत असल्याचे बोलले आहे.

एनडीटीव्ही चॅनेल ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रशांत बोलले की, ‘गेली आठ-नऊ वर्ष झाले मी हे काम करत आहे. एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर हे काम करावं असे नाहीये. त्यामुळे मी आता काही वेगळं करण्याचा विचार करत आहे. निकालापूर्वी मला खूप लोकांनी अतिशय खालच्या पातळीवर ट्रोल केले होते. त्यांना मी बोलले होते कि, भाजपा १०० च्या पुढे गेले तर मी माझी जागा सोडेल. मी जे बोलले होते ते झाले, मात्र तरीही मला आता हे काम करायचे नाहीये. मी हे काम सोडण्याचा विचार करत आहे. ‘

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *